अज्ञात वाहनाच्या धडकेत आसगाव चौ. येथील अभियंता मृत्यू
भंडारा प्रतिनिधी :- पवनी तालुक्यातील आसगाव चौ. येथील मृतक श्रीकृष्ण राजकुमार वंजारी वय ३० वर्ष वडील राजकुमार वंजारी सेवानिवृत्त शिक्षक व्यवसाय कंत्राटदार ( सिहिल इंजिनिअर) चंद्रपूर जिल्ह्यातील मुल ह्या ठिकाणी कामाचे साईड असल्या कारणाने मुल
परीसरात पत्नी आणि दोन मुलीसह राहत होते. त्यांचा परीक्षेचा सेंटर वडसा /देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे दिनांक १७-०५-२०२४ ला परीक्षा होणार असल्यमुळे मुळ गाव आसगाव चौ. वरुण वडसा जवळ असल्याने ते आदल्या दिवशी मुळ गावी आई वडील आणि दोन भावंड असून त्यांना भेटायला भंडारा जिल्ह्यातील आसगाव चौ. येथे दिनांक १६-०५-२०२४ ला स्वतःच्या मोटरसायकलने येण्यास निघाले असताना प्रवास दरम्यान अचानक वडसा येथील निरंकारी भवण जवळ अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकी स्वार यांचा जागीच मृत्यु झाला.
या यासंबंधी धडक देणाऱ्या वाहनाचा शोध पोलीस विभाग करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि आई वडील आणि दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
