नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अखेर कोंढाळीचे ग्रामीण रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाला सुरुवात जि प‌ सदस्य सलील देशमुख देशमुख यांनी कोंढाळी ग्रामीण रूग्णालय व बसस्थानाला दिली भेट, बांधकामांची केली पाहणी कोंढाळी : – येथील बहुप्रतिक्षित बांधकाम होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी जि प‌ सदस्य शलील देशमुख यांनी …

Summary

कोंढाळी : येथील बहुप्रतिक्षित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या रखडलेल्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्या बांधकामची पाहणी साठी नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती चे सदस्य सलील देशमुख यांनी०७जानेवारी रोजी केली. याप्रसंगी जागतिक महारींचा सामना करण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय सोयी-सुविधांसह कोंढाळीचे ग्रामीण रुग्णालय सुरू […]

कोंढाळी : येथील बहुप्रतिक्षित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या रखडलेल्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्या बांधकामची पाहणी साठी नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती चे सदस्य सलील देशमुख यांनी०७जानेवारी रोजी केली. याप्रसंगी जागतिक महारींचा सामना करण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय सोयी-सुविधांसह कोंढाळीचे ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

वर्ष २०१४ला या भागाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या भागातील नागरिकांचे आरोग्यासाठी व महामार्गवरिल गंभीर जखमींना आवश्यक मदत मिळावी या करिता येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जोन्नत करून राज्य सरकार कडून ५०खाटांचे अद्यावत सोईसुविधा युक्त ग्रामीण रूग्णालयाची मंजुरी मिळवून साडे चार कोटी चां बांधकाम निधी मंजूर करून घेतला होता.
यानंतर कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे अडीच वर्षे बांधकाम रखडले होते . अपूर्ण बांधकाम पुर्ण करण्यासाठी माजी आमदार अनिल देशमुख यांनी विधानसभेत वेळो वेळी निधीची मागणी केली होती. तेव्हा राज्य सरकार ने सात कोटी चा निधी केला होता. मात्र मंजूर निधी निर्गमित करण्यात आला नव्हता. या करीता जि प सदस्य सलील देशमुख यांनी तात्कालिन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वेळोवेळी निवेदने दिली.सध्या रखडलेल्या कामासाठी अंदाजे तीन कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून त्याचे बांधकाम मागील दोन आठवड्या पासून सुरू असल्याची माहिती जि प सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे.
बहुप्रतिक्षित असलेल्या ग्रामीण रूग्णालयाचे सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी सलील देशमुख यांनी नव निर्माणाधीन ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केली.
कोंढाळी बस स्थानकाचे अद्यावतीकरणाची पाहणी
नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी कोंढाळी येथील बस स्थानकाच्या वाहन तळ, व्हेदर शेड तसेच अन्य बांधकामांची पाहणी केली.
जि प सदस्य सलील देशमुख यांनी सांगितले की तीन वर्षांपूर्वी कोटोल ,नरखेड,कोंढाळी,व जलालखेडा या बसस्थानकाचे वाहन तळ कोंढाळी बस स्थानकावर व्हेदर शेड व अन्य आवश्यक कामांसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहकार्याने १७कोटी चा निधी मंजूर झाला होता. मात्र तो नीधी निर्गमित झाला नव्हता. या करिता जि प‌ सदस्य सलील देशमुख यांनी तात्कालिन परिवहन मंत्री एस टी महामंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, यांचे कडे पाठपूरावा करून नीधी निर्गमित करण्यात आला. या नीधीतून कोंढाळी बस स्थानकाचे विकासाठी तीन कोटी मंजूरीतून सुरू असलेल्या वाहनतळाचे प्राथमिक बांधकामाची 07जानेवारीला केली.
येथील बांधकाम सुरू असतांना एस टी चे वरिष्ठ बांधकाम अधिकारी कटरे बांधकाम देखरेख करत होते. याप्रसंगी मंजुरी बांधकाम प्रांकलनाप्रमाणेच करण्यात यावे अश्या सुचना ही जि प सदस्य सलील देशमुख यांनी दिल्या.
या प्रसंगी स्वप्निल व्यास, संजय राऊत, याकूब पठाण, कमलेश गुप्ता, हरिदास मडावी,नितीन ठवळे, प्रशांत खंते, आकाश गजबे,गोपाल माकोडे,रजा पठाण,प्रज्वल धोटे, तुषार राऊत,अफसर हुसेन, राहूल डोंगरे,किस्मत चौहान,परिमल हिंगणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *