BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अखेर,दीक्षाभूमी नागपूर सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका मध्ये नावाने करन्यासाठी

Summary

अखेर,दीक्षाभूमी नागपूर सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका मध्ये नावाने करन्यासाठी मा.उपविभागीय अधिकारी नागपूर यांनी मा.तहसिलदार नागपूर व भुमापन अधिकारी नागपूर यांना पत्र दिले आहे दिनांक२१/०६/२०२४ रोजी संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे […]

अखेर,दीक्षाभूमी नागपूर सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका मध्ये नावाने करन्यासाठी मा.उपविभागीय अधिकारी नागपूर यांनी मा.तहसिलदार नागपूर व भुमापन अधिकारी नागपूर यांना पत्र दिले आहे

दिनांक२१/०६/२०२४ रोजी संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी वरोरा चंद्रपूर यांनीच विनंती अर्ज मा.उपविभागीय अधिकारी नागपूर व वरिष्ठ महसूल अधिकारी जिल्हाधिकारी नागपूर, विभागीय आयुक्त नागपूर, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यालयात अर्ज दिला होता

दिनांक २८/०६/२०२४ ला माहीतीचा अधिकारात माहिती मागितली मी दिलेल्या अर्जावर आपण काय कारवाई केली,व का नाही केली जाब विचारला

दिनांक ०२/०७/२०२४ ला मा.उपविभागीय अधिकारी नागपूर यांनी तहसीलदार नागपूर व भुमापन अधिकारी नागपूर यांना कारवाई साठी पत्र दिले आहे, अशी माहिती आज दिनांक २२/०७/२०२४ रोजी लेखी मला पत्र दिली आहे

आता ज्याप्रमाणे मा.तहसीलदार नागपूर व भुमापन अधिकारी नागपूर यांनी एका दिवसात दीक्षाभूमी नागपूर या जमिनीला झुडपी जंगल,सडक, रस्ते, इमारत पड, शेती, दाखवून एका दिवसात फेरफार घेऊन सरकारी रेकॉर्ड सन २०२० मध्ये दुरुस्ती केले आहे
त्याअर्थी आता वरिष्ठ अधिकारी यांचा पत्रकाप्रमाणे व महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार दीक्षाभूमी, नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड दुरुस्ती करावे,व सुधारित ७/१२ व आखीव पत्रिका तयार करून एक प्रत तक्रारदार विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा लोकसेवक तथा तलाठी पटवारी वरोरा चंद्रपूर यांना माहिती करीता पाठवावे

तसेच दीक्षाभुमी,नागपूर मागील ७० वर्षापासुन शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी, तसेच कोट्यवधी बौद्ध समाज बांधवांचा विस्वासघात प्रकरणी, पोलिस प्रशासन यांना आर्थिक गैरप्रकार व्यवहार गंभीर रिपोर्ट देऊनही आजपर्यंत कारवाई केली नाही म्हणून आता ED चे डायरेक्टर श्री.राहुल नवीन यांनी कारवाई करावी अशी गंभीर रिपोर्ट सुद्धा केली आहे

दीक्षाभुमी, नागपूर येथील बेकायदेशीर खोदलेला खड्डा सुद्धा आज २२ दिवस होऊनही बुजविण्याचे काम केले नाही तात्काळ बुजवावे, तलाव निर्माण झाला आहे, दीक्षाभूमी स्मारकाला धोका निर्माण होऊ शकतो,
समाज बांधवांनी २४तास जागृत राहावे धन्यवाद
मा.उपविभागीय अधिकारी नागपूर यांनी, तहसीलदार नागपूर व भुमापन अधिकारी नागपूर यांना दिलेले पत्र,व प्रतिलिपी म्हणून मला दिलेले पत्र पाठवित आहे,
समाजाने सुद्धा महसूल अधिकारी यांना जाब विचारावे
जनहितार्थ जारी
समाजहितासाठी
देशहितासाठी
राष्ट्रबांधनीसाठी
समाजाने जागृत राहावे धन्यवाद

आपला अनुयायी
संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी वरोरा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *