अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनी व स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती तर्फे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारला येथील दुर्गा माता मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
Summary
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनी व स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती तर्फे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारला येथील दुर्गा माता मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत असून गंभीर […]
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनी व स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती तर्फे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारला येथील दुर्गा माता मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत असून गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. त्या अनुषंगाने पवनी शहरात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनी तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केला होता. यावेळी पवनी नगरातील सुदृढ नागरिकांनी, युवकांनी, ज्यांचे आरोग्य उत्तम आहे, त्यांनी पुढाकार घेऊन सामाजिक व्यक्तिमत्व जाणून,सामाजिक हित समजून व संकटाच्या काळात राष्ट्रहिताचा विचार करू रक्तदान केला. अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला.
स्वार्थी कर्मकार
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर