अकोल्यात ऐतिहासिक कावड यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त २,५०० पोलिस कर्मचारी, ४८० कॅमेरे व १० ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर पोलीस अधिक्षक – अर्चित चांडक
Summary
अकोला | दुर्गा प्रसाद पांडे अकोल्यातील ऐतिहासिक कावड महोत्सव यात्रेसाठी व्यापक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कावड यात्रा अकोल्यापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथून प्रारंभ होणार आहे. यात्रेसाठी गांधीग्राम येथे […]
अकोला | दुर्गा प्रसाद पांडे
अकोल्यातील ऐतिहासिक कावड महोत्सव यात्रेसाठी व्यापक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही कावड यात्रा अकोल्यापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथून प्रारंभ होणार आहे. यात्रेसाठी गांधीग्राम येथे प्रकाशयोजना, पार्किंगची सोय, तसेच मार्गावर ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी सुरक्षा व्यवस्थेसाठी २,५०० पोलिस कर्मचारी, सीआरपीएफचे पथक, ४८० सीसीटीव्ही कॅमेरे, १० ड्रोन कॅमेरे व वॉच टॉवर उभारण्यात आले असून, संपूर्ण यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

—
