अमरावती क्रीड़ा महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अंजनगाव सुर्जी येथील तालुका क्रीडा संकुलासाठीचा सकारात्मक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे निर्देश

Summary

मुंबई, दि. २३ : अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील तालुका क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाने शासनाकडे जागा हस्तांतरित करण्याचा सकारात्मक प्रस्ताव तात्काळ सादर करा, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले. कृषी विभागाची जागा अंजनगाव सुर्जी या तालुका […]

मुंबई, दि. २३ : अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील तालुका क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाने शासनाकडे जागा हस्तांतरित करण्याचा सकारात्मक प्रस्ताव तात्काळ सादर करा, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.

कृषी विभागाची जागा अंजनगाव सुर्जी या तालुका संकुलासाठीची हस्तांतरित करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आमदार बलवंतराव वानखेडे यांची उपस्थिती होती. तसेच  क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, कृषी विभागाचे आयुक्त धीरजकुमार, क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांची दूरदृष्य प्रणालीव्दारे बैठकीस उपस्थित होते.

मंत्री सुनील केदार म्‍हणाले, खेळाडू व नागरिक यांना क्रीडाविषयक पायाभूत सुविधा विकसित करून सराव, व्यायाम ,प्रशिक्षण इत्यादी साठी संकुले उभारणे गरजेचे आहे.लोकप्रतिनिधींनीही मागणी केली आहे. त्यामुळे ही जागा उपलब्ध करून देण्याकरिता शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव तात्काळ सादर करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *