अंकिसा ता. सिरोंचा येथे ग्रामपंचायत कार्यालयात लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या
Summary
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी सिरोंचा तालुक्यातील अंकिसा गावाला नुकतीच भेट दिली. या दौऱ्यात तेथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडी-अडचणी, गरजा व स्थानिक समस्या जाणून घेतल्या. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य […]

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी सिरोंचा तालुक्यातील अंकिसा गावाला नुकतीच भेट दिली. या दौऱ्यात तेथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडी-अडचणी, गरजा व स्थानिक समस्या जाणून घेतल्या. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा योग्य लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासनही खासदारांनी दिले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शामगोंडा, ग्रामपंचायत सदस्य कार्तिक जंगम, रामचंद्र गोगुला, मोहनराव दरा, सुरज डुडीया, मनोहर अरगेला, ललिता चलावार, गौरव येणप्रेडीवार, विपुल येलटीवार यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व शेतीशी संबंधित समस्या खासदारांसमोर मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉ. किरसान यांनी संबंधित विभागांशी तात्काळ संपर्क साधून समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
हा दौरा केवळ औपचारिक भेट नव्हता, तर जनतेशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न होता. उपस्थित नागरिकांनी खासदारांच्या या भूमिकेचे स्वागत करत त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार डॉ. किरसान यांचे अभिनंदन करण्यात आले.
पोलीस योद्धा नेटवर्क
न्यूज गडचिरोली
गजानन पुराम
तालुका प्रतिनिधि
मो. 7057785181