सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष यांच्यासाठी नवीन वाहन खरेदी
सिल्लोड (प्रतिनिधी ) दि.23, सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष यांच्यासाठी नवीन वाहन खरेदी करण्यात आले. सोमवार ( दि.21 ) रोजी हे वाहन सिल्लोड येथे दाखल झाले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते या वाहनाच्या चाव्या नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले , अशोक सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मो.हनिफ, शेख इम्रान , आशिष कटारिया आदिंची उपस्थिती होती.