शिवसेना शिवसंपर्क मोहिमेचा सिल्लोड मध्ये जोरदार शुभारंभ मुख्यमंत्री आणि शिवसेनेने केलेल्या जनहितार्थ कामाची माहिती प्रत्येक घरात पोहचवा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे शिवसैनिकांना अवाहन

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.11, शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष असून राज्यात नियोजनबद्ध काम करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचे काम मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केले असे स्पष्ट करीत सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना मिळवून देत मुख्यमंत्री आणि शिवसेनेने केलेल्या जनहितार्थ व सामाजिक कामाची माहिती प्रत्येक घरात पोहचवा असे आवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
सिल्लोड येथे रविवार ( दि.11 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या सखोल मार्गदर्शनाने शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचा शुभारंभ संपन्न झाला. शहरातील टिळक नगर व शिक्षक कॉलनी भागात शिवसेना पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक राखीताई परदेशी, युवानेते अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ.मॅचिंद्र पाखरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, न.प.तील शिवसेना गटनेते नंदकिशोर सहारे, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, राजेंद्र ठोंबरे, सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, रुउफ बागवान, राजू गौर, शेख बाबर, सुधाकर पाटील, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, रतनकुमार डोभाळ, मनोज झंवर, जितू आरके, सुनील दुधे, शेख सलीम हुसेन, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, शिवसेना महिला आघाडीच्या दीपाली भवर, मेघा शाह, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील, संतोष धाडगे, यांच्यासह रवी गायकवाड, मधुकर बेंडाळे, संतोष खैरनार, संजय फरकाडे, सुनील इंगळे, रामसेट कटारिया, भिकचंद कर्णावट आदिंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर चौफेर फटकेबाजी केली. कोरोना काळातील मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना भाजपने कोरोना संकटातही राजकारण केले. भाजपकडे योग्य नेतृत्व नसल्याने त्यांनी विविध पक्षातून आयात केलेल्यांना मंत्री पदे दिली असल्याचा घणाघात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर केला.
——————————————–
महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी सिल्लोड सोयगाव मतदार संघात कोरोना संकटात जे मदतकार्य केले ते उल्लेखनीय आहे. शहर , गाव ,वस्तीला कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी जनजागृती करून उपाययोजना कराव्यात, सामान्यांना न्याय देणे हीच शिवसेनेची भूमिका असल्याने गावागावात जावून सामान्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. शिवसेनेचा विचार आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचे कार्य लोकांसमोर मांडून शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम राबवा असे आवाहन जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी यावेळी केले.