नाॅर्वेत लसीकरण झाल्यानंतर 23 वृद्धांचा मृत्यू
नाॅर्वेत लसीकरणानंतर काही वेळातच 23 वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्याच बरोबर अनेक जण आजारी पडले आहेत या घटनेमुळे नाॅर्वेची डोकेदुखी वाढली असून सरकारने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
या नागरिकांचा मृत्यू फायझर लसीमुळेच झाल्याचं अजून निष्पन्न झालं नाही मात्र मृत्यू झालेल्या 23 लोकांपैकी 13 जणांमध्ये डायरिया आणि ताप यांची लक्षणे दिसुन आली असं तज्ञांच म्हणने आहे नाॅर्वेत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली चिंता व्यक्त होऊ लागल्या नंतर फायझरन युरोप मध्ये केला जाणारा लसीचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी कमी केला आहे.
द ब्लुमबर्गने या विषयाचे वृत्त दिले आहे नाॅर्वेत लसीकरण सुरू असुन लस घेतल्यानंतर काही वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे फायझर-बायोनटेक लस घेतल्यानंतर 23 जेष्ठ नागरिकांनचा मृत्यू झाला तर अनेक जण आजारी ही पडले आहेत
त्याच बरोबर आता 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्या संदर्भात विशेष इशारा ही विभागाने दिला आहे नाॅर्वेत डिसेंबरच्या अखेरीपासुन आतापर्यंत 30 हजार लोकांना फायझर वा माॅर्डन या दोन्ही एका लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क