▪ वर्धा नदीत नाव उलटली▪ ▪11 जणांना जलसमाधी !▪ ▪ दशक्रिया नंतर देवदर्शनासाठी जाताना झुंज तीर्थस्थळी दुर्घटना नवदांपत्यासह सख्ख्या बहिणी आणि मायलेकीचा समावेश ▪ ▪फुलंन्या आधीच कोमेजले ‘ आयुष्य ‘▪ ▪ तारा सावंगा येथील पाच जणांना जलसमाधी ▪

▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ▪
० श्री शेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात होडी ( नाव ) उलटून अकरा जण बुडाल्याची धक्कादायक घटना सकाळी 11 15 च्या सुमारास घडली . बुडालेल्या पैकी नावाड्यायासह तिघांचे मृतदेह नदी बाहेर काढण्यात आले. त्यात दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. इतर लोकांचा शोध बचाव पथकामार्फत सुरू आहे .मात्र दुपारच्यावेळी झालेल्या मुसळधार पावसाने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला .
गाडेगाव येथील मटरेल कुटुंबातील दशक्रिया विधी ला उपस्थित राहण्यासाठी जवळचे नातेवाईक सोमवारी गाडेगाव येथे पोहोचले होते दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व जण श्री शेत्र झुंज येथे पोहोचले या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे त्यामुळे कुटुंबातील बारा जणांना येथे नौकायनाचा मोह झाला .सकाळी दहाच्या सुमारास ते सर्व बारा जणांना नावड्यासह नावेत बसून महादेव मंदिराकडे जात असताना ती नाव नदीपात्रात उलटली त्यातील 11 जणांना जलसमाधी मिळाली यात वर्धा जिल्ह्यातील तारासांगा येथील चार महिला व एक पुरुष एकूण पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यात मुना सुखदेव खंडाळे वय 12आदिती सुखदेव खंडाळे वय 13 या दोन बहिणी व चुलत बहीण अश्विनी अमर खंडाळे वय 21 रूपाली अतुल वाघमारे वय 19 अतुल गणेश वाघमारे वय 25 हे पतीपत्नी असे मृतकाचे नाव आहे. हे पाचही जण तारासांवगा येतील असल्याने तारासावंगा येथे सर्वत्र शोककळा पसरली आहे .