▪ फवारणीसाठी मिळेना पेट्रोल▪ शेतकऱ्यांची तहसीलवर धडक▪ ▪युवा स्वाभिमानच्या नेतृत्वात तहसिलदारांनी पंप मालकांना ठणकावले ,पेट्रोल मिळाले▪

▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
०० शेतात फवारणी यंत्र चालवण्यासाठी पेट्रोल मिळत नसल्याने शेतात फवारणी करता येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी युवा स्वाभिमान नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.
सततच्या पावसाने पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत .रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पिकावर फवारणी करणे गरजेचे आहे. मात्र पेट्रोल पंपावर खुले पेट्रोल दिले जात नाही.
दुसरीकडे फवारणी यंत्र केवळ अर्धा , एक लिटर पेट्रोल बसते . त्यामुळे शेतात फवारणी कशी करावी. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे . यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्यापुढे समस्या मांडली . त्यांनी तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्याशी चर्चा केली.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांच्याकडे शेतकऱ्यांची कैफियत मांडली. शेतकऱ्यांची अडचण सोडवा. या मागणीला प्रतिसाद देत तहसीलदार चव्हाण यांनी पेट्रोल पंप चालकांना ठणकावले आणि शेतकऱ्यांना फवारणीसाठी पेट्रोल उपलब्ध झाले.
यावेळी कमलेश चिंधेकर खेडेकर , आदर्श वानखेडे, जयंत गमने ,शंकर हत्तीमारे ,शेतकरी गिरडे ,पवन कीरपाने , अमरदीप लादे, अमोल जगदाळे , दिलीप पटले, गणेश कैकाडे, संतोष लांजेवार, रवी बंडे, दीपक, गजानन कैकाडे. रामदास, शशिकांत , गजानन कैकाडे, सुदाम किरपाने .शेख रियाज ,अरविंद शेलोकार आदी शेतकरी उपस्थित होते.
▪पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
▪वर्धा, 73 78 70 34 72▪