▪ नाना—- नसतो डावा ▪ ▪ नाना —–नसतो उजवा ▪ ▪ नाना —–असतो माणूस ▪ ▪ माणूस– आणि माणूस ▪ ▪ संघर्ष——– हेच जीवन▪ ▪ जो डर गया वो मर गया हेच नानाचे जगण्याचे एकमेव सूत्र ▪ योग्य व्यक्ती योग्य निवड ▪ ▪ नाना—– एक दबंग नेता▪ ▪ नाना पटोले ———–बोलेतो लंबी—— रेस का घोडा ▪ ▪ एक मुलाखत प्रसिद्ध साहित्यिक याडीकार पंजाब चव्हाण यांच्या सोबत ▪ ▪ मुलाखत कर्ता महेश देवशोध ( राठोड )▪
▪ पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪
नाना , नानाभाऊ , नानासाहेब पटोले यापेक्षा मला महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नानाच लिहिणे हे मनापासून योग्य वाटते. खरे पाहता नाना पटोले यांना मी पहिल्यांदा साकोली मध्ये 1985 1986 यावर्षी पाहिलं असेल. त्यावेळी मी पिंडकेपार ( सडक ) या गावी ग्रामसेवक या पदावर काम करत होतो. सानगडी एरिया मध्ये असलेल्या सुकळी या छोट्याशा खेड्यातील नाना त्यावेळी बारावी किंवा ग्रॅज्युएट करत असेल ( नेमका आता मला आठवत नाही ) सडपातळ बांधा सुंदर चॉकलेटी चेहरा अभिताभ उंची आणि स्टाईल काळ्या कलरच्या बुलेट वरून नाना साकोली मध्ये इकडून तिकडे फिरायचा. लोकांचा घोळका दिसला की तिथे थांबायचा त्यावेळी बुलेटची खूप चलती होती . आणि नाना हा बुलेटवर एखाद्या दमदार हिरो सारखा शोभून दिसायचा नाही तरी नाना त्यावेळी हीरो होता आणि आजही तो राजकारणातला हिरोच आहे .
त्यावेळी नाना म्हणजे उनाड पोर . असे सर्वांना वाटायचे. साकोली तालुक्यात जयंत कटकवार आमदार काँग्रेसचे होते सर्व त्यानंतर डॉक्टर हेमकृष्ण कापगते बीजेपीचे झाले . गोपीनाथ गव्हाणे. ब्रिजलाल समरीत सभापती मंडळी तर खासदार म्हणून भाजपाचे आमगावचे महादेवराव शिवणकर साहेब होते . सेवक वाघाये . सुनील फुंडे आणि इतर शिवणकर , कापगते , पडोळे अशा फॅमिली मधील तरुण मंडळी त्यावेळी नुकतीच ठेकेदारी किंवा अन्य कामे करायची.
नानाजी पर्सनॅलिटी अगोदरपासूनच भारदस्त बोलण्यात लखब माणसं जोडण्याची कला प्रेमळ स्वभाव यामध्ये नाना पटोले सगळ्यात वेगळा वाटायचा . त्यावेळी त्या परिस्थितीला धरून मी तर जाऊ द्या पण नाना एवढ्या मोठ्या पदावर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष पदापर्यंत जाईल हे कोणीही स्वप्नात पाहिले नव्हते नाना चा भाऊ मला वाटते त्यावेळी पोलिस खात्यात चांगल्या नोकरीवर होते (मला आठवत नाही )नाना च्या मागे राजकीय कोणताही वारसा नसताना नाना मात्र कॉलेज जीवनातूनच संघटन कौशल्य असल्यामुळे राजकीय हालचालींमध्ये सतत राहायचा.
2014 ची लोकसभा लढविली आणि पाहता पाहता हा साकोलीचा नाना खासदार झाला पण पंतप्रधान मोदी चा चालू असलेला राज्यकारभार गोरगरीब लोकांच्या हिताचा आहे ना शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हे नानांनी लवकर हेरलं बऱ्याच अंशी बहुतेक खासदाराच्या लक्षात ही बाब आली परंतु हिंमत कोण करणार साध्या ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा देऊ वाटत नाही तेथे तर खासदाराचा प्रश्न होता .
संघर्ष हेच जीवन आणि जो डर गया वो मर गया हेच नानाचे जगण्याचे सूत्र आहे . आमच्या यवतमाळ मधील काँग्रेसचे नेते हरिभाऊ राठोड ( एक मताने सरकार वाचवून काँग्रेस साठी आपले राजकीय जीवन डावावर लावले ) आणि शिवाजीराव मोघे यांचे काय झाले ते केवळ दोन गटाच्या काँग्रेस भानगडीत या दोघांचाही पराभव झाला याला मात्र यवतमाळमधील काँग्रेसचे नेते जबाबदार असू शकतात .
▪ योग्य व्यक्ती योग्य निवड▪
जेव्हापासून नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी दौऱ्याचा सपाटा लावून काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्याचे काम ते करत आहेत . मोदी भक्त म्हणतात काँग्रेसची सत्ता आता पंचवीस वर्षे येत नाही असेच मोरारजी देसाई प्रधानमंत्री चे खिचडी सरकार असताना लोक सांगत असत पण पाच वर्षे ही सरकार टिकली नाही पुन्हा इंदिरा गांधी बहुमताने निवडून आल्या आता मोदी सरकारला रिक्षावाल्या पासून सिनेमात काम करणाऱ्या हिरो पर्यंत आणि चपराशाच्या पासून तर मुख्य सचिवा पर्यंत सगळेच कंटाळलेले आहे. शेतकऱ्याची तर सोडाच न बोललेलेच बरे .
जीएसटी, नोट बंदी लॉकडाऊन . खाजगीकरण यामुळे तर महागाई वाढली पण बेरोजगारी वाढून भयंकर उपासमार होत आहे लॉकडाऊन मुळे हजारो किलोमीटर चालताना अनेक माणसे मेली आणि अनेक बायांनी रस्त्यावर उघड्या जागेत आपली मुलं जन्माला घातली देशाची परिस्थिती आणीबाणी पेक्षाही बिकट झाल्याचे लोकांच्या लक्षात येत आहे .
नाना पटोले हा धडपडणारा माणुस अंकगणितात दोन अधिक दोन बरोबर चार होतात पण नानाच्या गणितात दोन अधिक दोन बरोबर पाच होतात हेच नानाचे खरे गमक आहे नाना म्हणजे जातीपाती धर्म , लिंग, भेदाच्या पलीकडे जाऊन काम करणारा सच्चा समाजसेवक आहे. गोरगरीब लोकांच्या प्रश्नासाठी लढतांना कधीही तडजोड करायची नाही हे त्यांनी मनाशी खुणगाठ बांधून ठेवली आहेत .
काँग्रेसचे येथे तर चुकते आमच्या महानायक वसंतराव नाईक साहेबांना काही कारण नसताना मुख्यमंत्री पदावरून हटविले तसेच जाणता राजा शरद पवार यांना संधी दिली नाही काहीही चूक नसताना जलनायक सुधाकर राव नाईक साहेबांना मुख्यमंत्री पदावरून हटविले ही या व अशी कारणे काँग्रेसला मेलेल्या अवस्थेत आणण्यासाठी प्रमुख होती आणि आहेत असे आपणास वाटत नाही का ???
एक मात्र खरे महाराष्ट्र दौऱ्यामध्ये नाना पटोले यांनी केलेल्या कार्यकर्त्या सोबत संवाद आणि काँग्रेसच्या मातब्बर नेता मंडळीशी केलेली सल्लामसलत आणि दोन गटातील वाद मिटवण्यासाठी त्यांनी सुरू केलेला प्रामाणिक खटाटोप या त्यांच्या जमेच्या बाजू असून त्यामुळे ते मेलेल्या काँग्रेस पक्षामध्ये प्राण फुंकत येईल तसे मला नाही तर तमाम बहुजनांना वाटत आहे.
मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणाऱ्यांना नाना पटोले यांना यश येवो. आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवो अशी या ठिकाणी अपेक्षा करतो !!!
धन्यवाद !
▪ याडीकार, पंजाब चव्हाण सुंदल निवास कदम ले आउट श्रीरामपूर . पुसद जिल्हा यवतमाळ . मोबाईल नंबर
95 52 30 2797 ▪
▪ पोलीस युद्ध वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध (राठोड)▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72▪