▪ तळीरामांची भटकंती▪ ▪ अवैद्य दारू व्यवसायाला लगाम▪ ▪ मात्र घरपोच दारू विक्री जोरात▪ ▪ सेलू तालुक्यातील वास्तव चित्र▪ ▪ जुन्यांना बसला तडाखा ▪ ▪नव्या दारू विक्रेत्यांचा उदय▪ ▪ गाव समित्या रखडल्या ▪
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा पत्रकार▪
▫️ सेलू ( घोराड ) शहरात खुलेआम होत असलेल्या दारू विक्रीला काही दिवसापासून पोलिसांनी आळा बसला असून. खुलेआम दारू विक्री होत नसल्याने मात्र विदेशी दारू चे भाव वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खुलेआम असणारी दारूची दुकाने बंद झाली. त्यामुळे दारू विक्री करणाऱ्याच्या घरासमोर लागणाऱ्या मद्यपींच्या वाहन रांगा आता दिसेनाशा झाल्या आहेत. दारूविक्री वर सेलू पोलिसांची करडी नजर असली तरी आता खुलेआम दारू विकण्याचा धंदा मंदावला आहे . या धंद्यात नव्याने उडी घेणार यांचे चे मात्र फावले आहे . दारू बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत असताना नवीन दारू विक्रेते तयार होत असून, आता मोबाईलवर दारू पोहोचती केली जात आहे. असे दारू विक्री करणारे मात्र पोलिसांपासून दूर आहेत. 200 रुपयांना मिळणारी विदेशी दारू आता 250 ते 300 रुपयांना घ्यावी लागत आहे. तर गावठी दारू कडे मद्यपींनी आपला मोर्चा वळविला आहे . सेलू शहरात खुलेआम दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी धंदा बंद केला असला तरी पण गाव खेड्यात विदेशी दारू विकणाऱ्या ची संख्या वाढत आहे . सेलु शहरात खुलेआम दारू विक्री वर चाप बसविण्यात पोलिसांना यश आले असले तरी ज्यांना दारू हवी आहे ते कुठून ना कुठून दारू मिळवीत असतात. सेलूत दिसत असणारे चित्र गाव खेड्यात निर्माण करण्याचे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध (राठोड ) ▪
▪73 78 70 34 72 ▪