▪ गुरु सेवालाल ▪ ▪ बंजारा समाज▪ ▪ आणि दैववाद ▪ ▪ एक आत्मचिंतन ▪ ▪सौ. सीमा जाधव. राठोड▪

० पोलीस योद्धा वृत्त सेवा ०
बंजारा समाज हा अनादिकाळापासून निसर्गपूजक असतांना आजच्या काळात तो आणि अनेक दैववादी पंथ , संप्रदाय , साधुसंत यात आपला समाज अडकलेला दिसतोय यामुळे बंजारा समाजाचा दैववादी सिद्धांतांवर भरोसा बसलेला दिसतोय त्यामुळे बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या केणी भजो मत पुजो मत या विचारांची पायमल्ली होताना दिसत आहे . सेवालाल महाराज बंजारा समाजाचे गुरु असताना त्यांचे विचार ज्या प्रमाणात समाजात रुजले पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. याची खंत आपल्या सर्व समाज बांधवांना झाली पाहिजे कारण आपली शक्ती, आपला पैसा आपण अनेक पंथ संप्रदाय यांना देण्यात धन्यता मानतो त्यामुळे तो संप्रदाय त्या पंथाचा प्रचार समाजात होत असल्यामुळे आपण सेवालाल महाराजांचे विचार पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडत आहोत .
केनी भजो मत , पुजो मत असे विचार दिल्यानंतरही आपला समाज अंधश्रद्धा , कर्मकांड करताना दिसत आहे. त्यामुळे विज्ञानाची कास न धरता दैववाद या समाजात दिसत आहे . आपण बघतोच आपल्या भारत देशात शीख धर्म असेल , जैन धर्म असेल त्यांनी त्यांच्या गुरूंना आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान दिले आहे. ते कुठल्याही संप्रदाय , पंथामध्ये सामील न होता . आपल्या गुरुचे महत्व कसे वाढेल याकडे लक्ष दिले . त्या विपरीत आपण सेवालाल महाराजांचे महत्व कमी करून बुवा ,बापू ,संत यांचे महत्त्व वाढवले , त्यामुळे होतं असं की सेवालाल महाराजांच्या विचाराचा पगडा कमी होऊन समाजात इतर विचारांचा पगडा पडतो . आज आपण बघतो ज्या बंजारा समाजाचा इतिहास सेवालाल महाराजांपासून सुरु होतो . त्यांची प्रतिमा समाजाच्या घरात न दिसता इतर बुवा, बाबा, संत, संप्रदाय, पंथ यांच्या प्रतिमा दिसतात.
▪ विशेषता शिकलेला वर्ग ▪ ० जाणजो ० छाणजो ० पचच मांणजो ० या क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांनी दिलेल्या विचारावर न चालता शिक्षित नसलेल्या समाज बांधवांना इतर संप्रदाय , पंथ या विचारावर चालण्यास भ्रमित करतो .
त्यामुळे समाजाची उन्नती न होता अधोगती होतांना दिसत आहे बंजारा समाजाने आता विचार करून विचार कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या समाजाचे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या विचारावर चालण्याची नितांत गरज आहे. नाहीतर समाज गुलामगिरीच्या खाईत लोटल्या शिवाय राहणार नाही.
प्रत्येक समाजामध्ये त्यांचे गुरु आहेत. मग आपल्या समाजामध्ये सुद्धा महान समाजसुधारक संत सेवालाल महाराज हे आपले गुरु असताना दुसऱ्या पंत समुदायात संप्रदायात जाण्याची काय ? गरज आहे. आपला एकच गुरु संत सेवालाल महाराज दीपस्तंभासारखे आपल्या पाठीशी असताना आपल्याला दुसऱ्या पंथ आणि संप्रदायाची गरज काय ???
० संत सेवालाल महाराजांची विज्ञानवादी परंपरा असून आपल्याला दुसऱ्याची गरज तरी
काय ????????? ०
▪पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72▪