▪वर्धा , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ओंम्बासे जरा गंभीर्याने घ्या हो !!!▪ ▪ गटशिक्षणाधिकारी तायडे हे डायगव्हाणे ला घालतात पाठीशी▪ ▪ वासुदेव डायगव्हाणे ची लबाडी उघड▪ ▪ 17.5 लाख रुपये वसुली आदेश▪

▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
वर्धा पंचायत समितीचे सोहम आश्रम शाळा येथील कार्यरत सहाय्यक अध्यापक वासुदेव डायगव्हाणे यांची विभागीय चौकशी केल्यानंतर त्यांचे वर 13 पैकी 11 दोषारोप सिद्ध झालेL त्यामुळे जि. प. चे मु. का. अ .चे डॉक्टर ओंबासे यांनी दिनांक 16 ऑक्टोंबर 2020 नुसार वस्ताद डायगव्हाणे गुरुजी सह मूळ वेतनावर आणण्याची शिक्षा केली. त्यासोबतच 3 नोव्हेंबर 1997 पासून आज पावेतो पदवीधर नसताना लबाडीने वेतन उचलले . त्याबाबत वित्त विभागाने त्यांचे विरुद्ध 17.5 लक्ष रुपयाच्या वसुलीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते .मात्र वर्धा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी धनोबा यांनी नागोबा बसल्यासारखे डायगव्हाणे ला पाठीशी घालून गव्हाणे च्या लक्ष्मी ची राखण केल्याचे प्रकरण पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये राज्यामध्ये आंजी(मोठी ) चे सदस्य राजेंद्र डोळस कर यांनी सभागृहापुढे उघड केल्याने संपूर्ण सभागृह अवाक झाले . तेव्हाच वस्ताद डायगव्हाणे गुरुजीच्या वसूली संदर्भात सभागृहाने सर्वानुमते ठराव मंजूर केला. परंतु धनोबा .यांनी अद्यापही कुठलीच कारवाई केल्याचे दिसत नाही.
शासनाची फसवणूक करणारे डायगव्हाणे गुरुजी ग्रामीण भागात राहून सुद्धा शहरी घरभाडे भत्ता उचल करीत असल्याची सुद्धा लबाडी पुन्हा उघड झाली. त्यामुळे त्यांचे विरुद्ध मु .का.अ. ओंम्बासे यांनी घर भाडे वसूल करण्याची दुसरी शिक्षा कायम केली. मात्र येथेही धनराज तायडे यांनी डायगव्हाणे संदर्भात ओंम्बासे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फेब्रुवारी 2021 महिना येईस्तोवर वाट बघावी लागली.
धनराज तायडे गटशिक्षणाधिकारी वर्धा हे यांचे आदेशानुसार कारवाई करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याने राजेंद्र डोळसकर पंचायत समिती सदस्य व सभागृहातील सदस्यांनी वस्ताद डायगव्हाणे च्या लबाडीचा प्रश्न लावून धरल्याने कसेतरी फेब्रुवारी 2019 पासून मूळ वेतनावर आणून वेतन काढण्याची माहिती प्राप्त झाली. परंतु 16 ऑक्टोंबर 2020 ला दिलेल्या सी. ई .ओ. यांच्या आदेशाकडे आर्थिक देवाणघेवाणीतून जाणीवपूर्वक प्रकरण गंभीर असतानाही नोव्हेंबर दोन हजार वीस पासून कारवाई करणे आवश्यक होते. त्यामुळे डायगव्हाणे यांचा आदेश होऊन सुद्धा तीन महिन्याचे ज्यादा वेतन देण्यामागील धनराज यांचा काय हेतू होता हे सिद्ध झाले. त्यांच्या पगारातून 17.5 लाख रुपये वसूल करणे अनिवार्य आहे. परंतु गटशिक्षणाधिकारी धनराज तायडे यांनी पंचायत
समितीच्या मासिक सभेत डायगव्हाणे यांच्या सेवानिवृत्तीस पाच वर्षाचा काळ शिल्लक असल्याने व त्यांना मूळ वेतनावर आणल्यामुळे त्यांची पगारातून वसुली होऊ शकत नाही. असे असंवैधानिक उत्तर सभागृहापुढे दिले . एवढेच नव्हे तर त्यांच्या उदरनिर्वाहाची गंभीर दखल तायडे कशी घेतात यांचाही नमुना सभागृहापुढे आला शासकीय निर्देशानुसार वेतनाच्या 40 टक्के वेतन त्यांना देणे गरजेचे आहे. असे उत्तर सुद्धा सभागृहाला दिले. जेव्हा की त्यांच्या वेतनाची वार्षिक बेरीज केली तर त्यांना इन्कम टॅक्स पडत नाही. तरी त्यांना रिटन मिळावा हा हेतू ध्यानात ठेवून त्यांची जाणीवपूर्वक आयकर कपात डायगव्हाणे यांच्या सोयीसाठी केली जात आहे आणि स्वतः डायगव्हाणे सुद्धा डीडी-१ वरून वेतन काढत असल्याने तेथेसुद्धा शासनासोबत लबाडी केल्याचे उघड झाल्याचे दिसून येते.
प्राप्त माहितीनुसार त्यांना अंदाजे 40 हजार एकूण वेतन मिळत आहे. त्यातूनही जिल्हा परिषद बँकेचे लोन आठ हजार पाचशे व जीपीएफ नियमाप्रमाणे मूळ वेतनाच्या दहा टक्के कपात व्हायला हवी त्याप्रमाणे तो जीपीएफ तीन हजार व इतर 12 हजार 500 रुपये कपात केल्यास त्यांना जवळपास 28 हजार रुपये मिळू शकतात. त्यामुळे आता 20 हजारावर चाळीस टक्के रक्कम उदरनिर्वाहासाठी 12 हजार रुपये द्यावे. उर्वरित जनतेचा पैसा शासकीय तिजोरीतून लबाडीने घेतल्याने 16000 वेतनातून दरमहा वसूल करावी म्हणजेच वर्षाचे 1 लाख 92 हजार रुपये होतात . याप्रमाणे चार वर्षात त्यांचेकडून 7 लाख 68 हजार रुपये वसूल होतील व उर्वरित रक्कम त्यांचे ग्रॅज्युटी मधून जिल्हा परिषद ने कपात करावी. यासोबतच ज्यादा घरभाडे भत्ता सुद्धा वसूल करावा ही सर्व कारवाई करण्यास गटशिक्षणाधिकारी यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचे पंचायत समितीच्या सभेत अनेकदा उघड झाले. सभागृहाने डायगव्हाणे यांच्या विषयावर अनुपालन मागितले असता धनोबा तायडे हे टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले .त्या सर्व प्रकरणावरून गटशिक्षणाधिकारी धनराज तायडे यांनी मोठ्या प्रमाणात डायगव्हाणे च्या लक्ष्मी दर्शनाचा आस्वाद घेत असल्याची शंका निर्माण होत असल्यामुळे जि. प. चे मु .का .अ .डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लिंबाजी सोनवणे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांनी वासुदेव डाय – गव्हाणे गुरुजी सह पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनोबा उर्फ धनराज तायडे हेसुद्धा पाठीशी घालत असल्यामुळे पोलिसी खाक्यात सहआरोपी झाल्यामुळे डॉक्टर सचिन ओंबासे यांनी वासुदेव डायगव्हाणे सह धनराज तायडे यांच्याविरुद्ध शासकीय कारवाई करण्याची मागणी सभागृहातील सदस्यांनी बोलून दाखवली.
(क्रमशः ….)
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72 ▪