० आर्वी ते तळेगाव महामार्गाचे काम संथगतीने जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास ० ० आणखी किती जणांच्या अपघाताची प्रतीक्षा० ० लोकप्रतिनिधी सोबत अधिकारी सुद्धा उदासीन० ० वेगाने काम करण्याची मागणी ० महामार्ग बनत आहे जीव घेणारा मार्ग०
० पोलिस योद्धा वृत्तसेवा ०
० सध्या तळेगाव आर्वी हा बारा किलोमीटरचा प्रवास एक जीवघेणा मार्ग बनला आहे . गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या कामाला पूर्णत्वास होण्याचा मुहूर्त काही सापडतांना दिसत नसल्याने वाहनचालकांना या मार्गावरून जाताना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे, विशेष म्हणजे या मार्गावरून लोकप्रतिनिधी नेहमी जाणे येणे करत असताना सुद्धा यावर उपाय सापडत नाही हे न सुटलेले कोडे आहे.
तीन वर्षापासून सुरू असलेल्या कासवगती कामाला आता जरा चालना मिळाली दिसत आहे . परंतु नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळत आहे.ठीक ठिकाणी खोदून ठेवल्याने व खोदलेल्या ठिकाणी माती मिश्रित मुरूम टाकला असल्याने आणि त्यातच भर म्हणजे सध्या पावसाळा सुरू असून आलेल्या पावसामुळे या रस्त्यावर सर्वत्र चिखल व डबके तयार होत आहे याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसत आहे. या चिखलावरून वाहने घसरत असल्याने मोठे अपघात या ठिकाणी होत आहे . आर्वी हे उपविभागीय कार्यालयाचे ठिकाण असल्याने आष्टी , कारंजा तालुक्यातील गावातील नागरिक शासकीय अथवा वैयक्तिक कामानिमित्त रोज आर्वीला येत असतात. त्यातच आर्वी वरून रोज अपडाऊन करणारा कर्मचारी वर्ग सुद्धा जास्त असून या खराब रस्त्यामुळे त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच लहान मुलांना घेऊन जात असताना मोठी तारेवरची कसरत या रस्त्यावर करावी लागत असल्याने मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .
एकमेकांना वाचवतांना घडत आहे . अपघात निर्माण होत असलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात सर्वत्र चिखल व होऊन तापल्यावर सर्वत्र धूर राहत असल्याने वाहने एकमेकांच्या आमने-सामने येत आहेत आणि अशातच एकमेकांना वाचवतांना मोठे अपघात घडत आहे .आज चेन्नई वरून भोपाळला जात असलेला ट्रक एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात पलटी झाला ज्या ठिकाणी हा ट्रक पलटला त्या ठिकाणी मुरूम टाकून होता . याअगोदर सुद्धा लोकांचे अपघात या ठिकाणी झाले आहेत झाले आहेत .
युवा स्वाभिमान ने दिले होते निवेदन तर शिवसेनेने फोडले होते कार्यालय या रस्त्याची दखल घेण्यासंदर्भात युवा स्वाभिमानचे आक्रमक पदाधिकारी दिलीप पोटफोडे यांनी आष्टी तहसीलदार यांना निवेदन देऊन काही गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते . त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी वर प्रकाश टाकला होता तर शिवसेनेचे तत्कालीन उपजिल्हाप्रमुख बाळा जगताप यांना नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरुन तत्कालीन ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात चांगलाच राडा केला होता, पण निगरगट्ट प्रशासनाला काही जाग आला नाही. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी का ? गप्प राहतात हे न सुटलेले कोडे आहे. पण याच्या गप्प राहिल्याने कुणाचे संसार उघडे पडत आहे हे मात्र नक्की याचा विचार व्हायला हवा !
० पोलीस योद्धा वृत्तसेवा ०
० प्रफुल्ल भुयार०
० आर्वी , तालुका प्रतिनिधी ०
० 90 49 18 47 22 ०