वर्धा

तरोडा ग्रामपंचायत सरपंच पायउतार ००0

Summary

०आर्वी वार्ताहर ० ग्रामपंचायत तरोडा येथील काँग्रेसच्या सरपंच नंदा प्रभाकर गायकवाड यांच्या विरुद्ध 24 ऑगस्ट 2019 ला ग्रामपंचायत सदस्य द्वारा 7 विरुद्ध शून्य या मताने अविश्वास ठराव संमत झाला . त्यामुळे त्यांना सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले आहे. अविश्वास ठराव […]

०आर्वी वार्ताहर ०

ग्रामपंचायत तरोडा येथील काँग्रेसच्या सरपंच नंदा प्रभाकर गायकवाड यांच्या विरुद्ध 24 ऑगस्ट 2019 ला ग्रामपंचायत सदस्य द्वारा 7 विरुद्ध शून्य या मताने अविश्वास ठराव संमत झाला . त्यामुळे त्यांना सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले आहे.
अविश्वास ठराव यामध्ये सातही ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्या विरोधात होते या अविश्वास ठराव आला संमती बाबत 2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरोडा येथे विशेष ग्रामसभा घेऊन सकाळी 11 वाजता पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत गुप्त मतदान घेण्यात आले त्यामध्ये बहुमताने अविश्‍वास ठरावाला मंजुरी मिळाली. ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेणे . पत्नी सरपंच असताना पतीने हस्तक्षेप करणे . घरकुल बांधकामात गैरव्यवहार करणे, आदी गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी यांचे सरपंचावर होते. यावेळी भाजपा आणि काँग्रेस या गटातील सदस्यांनी सरपंच यांच्या विरोधात ठरावाला संमती नोंदवली आणि विशेष ग्रामसभा गटविकास अधिकारी यांच्या संमतीने आर्वी येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .

० पोलीस योद्धा वृत्तसेवा ०
० प्रफुल भुयार०
० तालुका प्रतिनिधी , आर्वी ०
० 90 49 18 47 22 ०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *