राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता : बरड वस्तीत पोहचली वीज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नवीन विजेचे लोकार्पण गावकऱ्यांनी वाजतगाजत केले मान्यवरांचे स्वागत
Summary
सिल्लोड प्रतिनिधी दि.22, तालुक्यातील अजिंठा गावालगत नव्याने वसलेल्या बरड वस्ती येथे विजेचा प्रश्न प्रलंबित होता. गावातील नागरिकांनी ही बाब महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा […]
सिल्लोड प्रतिनिधी दि.22, तालुक्यातील अजिंठा गावालगत नव्याने वसलेल्या बरड वस्ती येथे विजेचा प्रश्न प्रलंबित होता. गावातील नागरिकांनी ही बाब महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने प्रशासनाच्या अथक परिश्रमाने आज आठ दिवसानंतर या वस्तीत वीज पोहचली. सोमवारी ( दि.21 ) रात्री 8 वाजता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते डीपीचा स्विच चालू करून बरड वस्तीतील लोकांना नवीन विजेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
*मूलभूत सुविधा हा नागरिकांचा अधिकार*
खास बाब म्हणून बरड वस्तीतील लोकांच्या नावाने नमुना नंबर 8 दिले जाईल, आठ दिवसात वीज उपलब्ध करून दिली.तात्काळ गावाला नवीन पाणी पुरवठा योजना दिली जाईल.वस्तीतील सर्व लोकांना रेशनकार्ड व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाईल अशी ग्वाही देत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत वस्तीतील मुलांना शिक्षण घ्यावे असे आवाहन गावकऱ्यांना केले. सोबतच खास बाब म्हणून या वस्तीला शासकीय सर्व योजनेचा लाभ मिळून द्या असे निर्देश राज्यमंत्री यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
*पाणी आणि घरकुलचा लाभ प्राधान्याने देणार*
भविष्यात ज्या ज्या योजना लागतील त्या सर्व योजनेचा लाभ या वस्तीला मिळवून देवु गावाचा सर्व्हे करून पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करा.तात्काळ गावात नवीन पाण्याच्या टाकी साठी 10 लाख रूपये दिले जातील. येत्या चार महिन्याच्या आत गावात पाणी आणि खास बाब म्हणून ज्यांना घरे नसतील त्यांना घरे मिळवून देऊ असे यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
*रांगोळ्यांची आरास आणि वाजतगाजत स्वागत*
आज वस्तीत वीज येणार व त्यानिमित्ताने मंत्री, जिल्हाधिकारी देखील येणार हे माहीत पडताच सकाळ पासूनच वस्तीतील नागरिकांची एखाद्या सण उत्सवा सारखी तयारी सुरू होती. महिला, पुरुष, बाल- गोपालांनी नवीन कपडे परिधान केले होते. तर वस्तीतील प्रत्येक घरापुढे आकर्षक रांगोळ्यांची आरास पहायला मिळाली. सायंकाळी मान्यवरांचे आगमन होताच गावकऱ्यांनी वाजतगाजत त्यांचे स्वागत केले. तर विजेच्या नवीन प्रकाशात विद्यार्थी हौशीने अभ्यास करताना दिसले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे, महावितरण मुख्य अभियंता भुजंगराव खंदारे, उप नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागिय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागिय पोलिस अधिकारी विजय मराठे, तहसिलदार विक्रम राजपूत, सोयगावचे तहसिलदार प्रविण पांडे, संजय आकोडे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनिस, उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे, अनिल सैवर, सहायक अभियंता प्रदीप निकम, दीपक साखले, अशोक सूर्यवंशी, दुर्गाबाई पवार आदिंसह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.