यवतमाळ येथे कोरोना योद्धा सत्कार समारंभ दिनांक :- 06/10/21
गिरीश डोये वेगावकर
कोरोना योद्धा सत्कार समारंभ
ग्रामीण भागात प्रशासकीय महत्वाचा दुवा म्हणुन पोलीस पाटील महत्वची भूमिका बजावत असतात. गेल्या दोन वर्षा पासुन कोविड 19 मुळे संपुर्ण जग कोरोना च्या भीति खाली जीवन जगत आहे. संपुर्ण जन जीवन विस्कळीत झाल असताना डोंगराळ ग्रामीण भागात गावातील पोलीस पाटील महत्वाची भुमिका बजावत होते याच कार्याची दखल घेऊन पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील पोलीस स्टेशन ठानेदार मा. रामकृष्ण महाले साहेब, तहसीलदार मा. बिजे साहेब यानी कॉरोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन वाढोना (बु) चे पोलीस पाटील मा. सतीशजी पेचे पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणुन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. या कार्यामुळे त्यांच्या मित्र परिवारात आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.
उल्लेखनीय की त्यांचे वडील सुद्धा त्याच गावचे पोलीस पाटील म्हणुन सेवा करत होते त्याच कार्याचा वसा घेऊन मा. सतीशजी पेचे पाटील, पोलीस पाटील म्हणुन सेवा देत आहे.