*भारतीय जनता पार्टी🌷 यवतमाळ शहर* 🙏 *डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन*🙏 *प्रा.डॉ. नितीन खर्चे यांचे व्याख्यान*
भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्त्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 23 जुनला पुण्यतिथी व 6 जुलैला जयंती आहे. त्यानिमित्त भाजपा यवतमाळ जिल्हा तर्फे जिल्हा नेते माननीय *आमदार मदनभाऊ येरावार*, भाजपा जिल्हा अध्यक्ष *श्री नितीनभाऊ भुतडा* यांच्या मार्गदर्शनात पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करणे, भाजपाचा हा ध्वज फडकवणे, वृक्षारोपण करणे, साफ सफाई अभियान राबविणे हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
आज भारतीय जनता पार्टी यवतमाळ शहराच्या वतीने जिल्हा कार्यालयात शहराध्यक्ष *श्री प्रशांतभाऊ यादव पाटील* यांचे हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व भाजपाचा ध्वज फडकविण्यात आला.
*प्रा. डॉ. नितीन खर्चे सर* यांचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर व विचारांवर प्रकाश टाकणारे *व्याख्यान* आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आले. *”डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन हे देशासाठी केलेला त्याग व बलिदानाचे प्रतीक असून त्यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी आहे”* असे प्रतिपादन त्यांनी केले. भाजपा जिल्हाध्यक्ष *श्री नितीन भाऊ भुतडा* यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे व कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन केले. भाजपा शहराध्यक्ष *श्री प्रशांतभाऊ यादव पाटील* यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना यवतमाळ शहरात होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष व प्रदेश भाजपा आध्यात्मिक आघाडीचे *शंतनु शेटे* यांनी केले.प्रास्ताविक शहर सरचिटणीस *प्रा. डॉ. अमोल देशमुख* यांनी केले तर आभार शहर सरचिटणीस *अजय खोंड* यांनी मानले. तांत्रिक साहाय्य युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष *श्री आकाशभाऊ धुरट* व *आशिष डंभारे* यांनी केले.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री *राजुभाऊ पडगीलवार*, कार्यक्रमाचे संयोजक व शहर सरचिटणीस *हेमंत दायमा,* महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष *सौ. मायाताई शेरे*, शहर कार्यालय मंत्री *रमेश फुलकर* उपस्थित होते तर आभासी माध्यमाद्वारे सर्व *नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी* यांचेसह 100 चे वर कार्यकर्ते सहभागी झालेत.