जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे यासाठी प्रहार शिक्षक संघटना ठाम
जिल्हा चन्द्रपुर वार्ता:- शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही आदेश देऊ शकत नाही असे शासनाने 31 ऑगस्ट 2020 ला शासन परिपत्रक निर्गमित केले, त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने प्रहार शिक्षक संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी शिक्षक व जिल्हा परिषद मधील एकूण 14 हजार कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे यासाठी जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी, मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी यांना 7 सप्टेंबर 2020 रोजी निवेदन देऊन शासन परिपत्रका प्रमाणे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याची कारवाई करण्यासाठी निवेदन सादर केले. व संघटनेच्या सर्व सभासदांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढले.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज देऊच शकत नाही याची जाणीव जिल्हा परिषद मधील शिक्षक व इतर कर्मचारी यांना झालेली असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मर्यादा असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सोयी सुविधा देऊ शकत नाही याची जाणीव असल्यामुळे प्रहार शिक्षक संघटना ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 21 ऑक्टोबर 2020 ला बैठकीचे निमंत्रण असतांना बैठकीला गेली नाही. प्रहार शिक्षक संघटनेच्या झालेल्या चर्चेतून निष्फळ चर्चा करण्यासाठी सी डी सी सी बँकेच्या बैठकीला जाण्यात काहीच अर्थ नव्हता त्यामुळे प्रहार शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढण्याची प्रकिया सुरु असल्यामुळे बैठकीला जायचं नाही त्यामुळे प्रहार संघटना ही सी डी सी सी बँकेच्या बैठकीला गेली नाही. ज्या
13 शिक्षक संघटनानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मागणीचा प्रस्ताव ठेवला, त्यामध्ये 30 लाख अपघात विमा,
20 लाख आंशिक अपंगत्व,
10 लाख नैसर्गिक विमा कवच या मागण्याच प्रहार शिक्षक संघटनेला अमान्य आहेत.
बैंक ऑफ महाराष्ट्र, बैंक ऑफ बरोड़ा सारख्या राष्ट्रीयकृत बैंक च्या स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज प्रमाणे
40 लाख अपघात विमा
40 पूर्ण अपंगत्व
20 लाख आंशिक अपंगत्व
1 करोड़ एअर अपघात
2 लाख एटीएम विमा
50 हजार प्रतिदिन एटीएम मर्यादा
1 लाख कॅशलेस सुविधा अपघात झाल्यास लगेच दिल्या जातात. एवढंच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँका ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे
कर्ज स्थानांतरित करायला तयार आहेत या सारख्या सुविधा मिळत असतांना आमच्या कर्मचारी यांची यापूर्वीच फार मोठे आर्थिक नुकसान झालेले असून जयदास सांगोडे यांनी स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज जिल्हा परिषद कर्मचारी यांना मिळावे म्हणून सन 2013 पासून मागणी केली होती. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने या मागणी कडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जयदास सांगोडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे 28 मार्च 2019 ला राष्ट्रीयकृत बँकेत वेतन करावे अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यात 6 मे 2020 ला चर्चा जयदास सांगोडे यांच्या निवेदनावर चर्चा होऊन 16 लाख विमा कवच देऊन तुटपुंज्या सोयी देऊन बोळवण केली. त्यामुळे आता शासनाच्या 8 ऑक्टोबर 2020 व 31 ऑगस्ट 2020 च्या शासन परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी हे आपले खाते राष्ट्रीयकृत बँकेत काढणार असून प्रहार शिक्षक संघटना यावर ठाम असून आपल्या कर्मचारी व शिक्षक यांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही तसेच इतर शिक्षक संघटनांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 30 लाख विमा व इतर मागण्या प्रहार शिक्षक संघटनेला अमान्य आहेत. असे संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे संघटनेचे सरचिटणीस विनोद लांडगे, कोषाध्यक्ष नागेश सुखदेवे, कार्याध्यक्ष देवेंद्र रायपुरे, संपर्क प्रमुख अमोल खोब्रागडे, उपाध्यक्ष प्रकाश बनसोड, सहसचिव होमेन्द्र मेश्राम, धर्मेद्र मेश्राम, अमोल जनबंधू, मुन्ना येरणे, दिनेश कवाडे, संजय काकडे, प्रदीप मानवटकर, प्रकाश बनसोड, प्रमोद लोधे, आशा करवाटकर, छाया जांभूळे, बेबी पाल, आरती रामटेके, अनुजा खोडके, सुषमा निनावे, सुधा सिन्हा, यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.