▪ काला टीका▪ ▪ बाळाला काळा टिका का ? लावतात ▪ ▪ गाडीला लिंबू मिरची का ? लावतात ▪ ▪ कुंडल्या पाहून लग्नाचे मुहूर्त का ? काढले जातात ▪ ▪ शुभमुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक , राष्ट्रपती, प्रधानमंत्री होईल काय ?▪ ▪ मुहूर्त पहाणारी पेशवाई नष्ट का झाली ?▪ ▪ जर तुमचं मन साफ असेल व तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही शुभ असते ▪
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
बाळाला काळी टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात बालमृत्यूदर 0 असता .
गाडीला लिंबू मिरची लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात अपघाताची संख्या शून्य असती.
पूजा करून धंद्यात बरकत आली असती तर भारतात सगळेच उद्योजक झाले असते.
बुवा बाबा कडे जाऊन दुःख निवारण झाले असते तर समस्त बुवा बाबा भक्त सुखी दिसले असते .
कुंडल्या मिळवून नवरा-बायकोची मनं जुळली असती तर सगळी अरेंज मॅरेजेस यशस्वी झाली असती .
यज्ञ करून जिंकता आले असते तर भारत एकही मॅच हरला नसता .
चिकित्सक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला प्रगत करेल .
– : मुहूर्ताची वेड :-
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ !
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहत नाही . व मरताना ही पाहत नाही .
तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ असतात . फक्त इच्छाशक्ती प्रबळ असली की आपल्यासाठी सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ ठरतात .
कुंडल्या पाहून लग्नाचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रिया विधवा व पुरुष विदुर का होतात ? .
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का होतात , तर काही अकाली मृत्यु होतात असे का ?
95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाही तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा ?
मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात . असे का घडते ? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?
मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी शुभमुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात ? मंत्रीपद अल्प कालावधीतच का जाते !
शुभ मुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक , राष्ट्रपती , पंतप्रधान होईल काय ?
अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली व्यक्ती ती पण अंबानी सारखी झाली का ?
वसंतराव नाईक यांच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली व्यक्ती ती पण वसंतराव नाईक यांच्या सारखी झाली का ?
उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर , उद्योजक आपल्या कार्यालयाचे बांधकाम करतांना , व्यवसायास प्रारंभ करतांना मुहूर्त पाहूनच सर्व करतात. तरीसुद्धा कित्येकांना अपयश येते असे का ?
▪ कारण ▪
मुहूर्त पहाणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिश शाही अख्खा भारत देश गिळून बसली. स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा .
तुमचं मन साफ असेल तर व तुमच्या मनात प्रयत्न करण्याची क्षमता असेल तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही शुभमुहूर्त असते. चला तर आज पासून शुभा-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या——— ——–कष्टावर विश्वास ठेवा .
▪ चला आपला समाज अंधश्रद्धा मुक्त करूया ! ▪
▪महेश देवशोध (राठोड)▪
माजी संघटक
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति . भंडारा.
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा ▪
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ▪
▪73 78 70 34 72▪
▪ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति माजी संघटक जीप भंडारा