हवामान सूचना
हवामान सूचना: गडचिरोली जिल्ह्यामध्ये, भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या अंदाजानुसार, दिनांक १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ आणि आणि दिनांक १७ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांसाठी सूचना: पाऊस होण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकाची तात्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाची वेचणी राहिली असल्यास लवकरात लवकर वेचणी करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील पिकास आवशक्यता नसल्यास ओलीत करणे पुढे ढकलावे.
सौजन्य: ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली व प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर.
पोलीस योद्धा न्यूज रिपोटर
अक्षय गावळे
ता. कुरखेडा
जिल्हा. गडचिरोली