महाराष्ट्र

सैनिकी शाळा मध्ये ओबीसींना मिळणार 27 टक्के आरक्षण. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाला यश

Summary

इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना आता सैनिकी शाळा मध्ये 27 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021- 22 या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्र शासनाचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. या […]

इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना आता सैनिकी शाळा मध्ये 27 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021- 22 या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्र शासनाचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 2 डिसेंबर 2019 रोजी मा. पंतप्रधान भारत सरकार यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केंद्रीय नवोदय विद्यालय आणि सैनिकी विद्यालयांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी केली होतीआणि त्यासाठी आंदोलन सुद्धा केले होते. तसेच ओबीसी पार्लमेंट कमिटीचे अध्यक्ष खासदार गणेश सिंग यांच्याकडे सुद्धा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याचा परिणाम केंद्र शासनाने मे 2020 रोजी नवोदय विद्यालयांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू केले होते. आणि आता सैनिकी विद्यालया मध्ये सुद्धा ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. भारतातील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, समन्वयक डॉ अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, शरद वानखेडे, गुणेश्वर आरेकर, प्रा.संजय पन्नासे,बबलू कटरे, सुषमा भड,रेखा बारहाते, श्याम लेडे, कल्पना मानकर यांनी केंद्र शासनाचे तसेच ओबीसी पार्लमेंट कमिटीचे अध्यक्ष खासदार गणेश नाईक यांचे आभार मानले आहे.

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *