सेवनिवृतिनिमित्य डॉ. प्रदीप घोरपडे यांचा भावपूर्ण सत्कार. संघटना हीच माझ्या जीवनाची शक्ती-डॉ. प्रदीप घोरपडे 💐💐💐💐💐💐💐💐💐
Summary
जिल्हा गडचिरोली वार्ता:- प्राध्यापक समाजाचा आधार असून त्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी कार्य करण्याची संधी संघटनेच्या माध्यमातून मला प्राप्त झाली हे माझे भाग्य असून संघटना हीच माझ्या जीवनाची शक्ती असल्याचे प्रतिपादन सत्कारमूर्ती व संघटनेचे आधारस्तंभ डॉ. प्रदीपराव घोरपडे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठ […]
जिल्हा गडचिरोली वार्ता:- प्राध्यापक समाजाचा आधार असून त्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी कार्य करण्याची संधी संघटनेच्या माध्यमातून मला प्राप्त झाली हे माझे भाग्य असून संघटना हीच माझ्या जीवनाची शक्ती असल्याचे प्रतिपादन सत्कारमूर्ती व संघटनेचे आधारस्तंभ डॉ. प्रदीपराव घोरपडे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रदीपराव घोरपडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल श्रीफळ आणि सन्मान पत्र देऊन सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.घोरपडे म्हणाले, “आदरणीय बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनामुळे नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठात संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापकांचे प्रश्न मला सोडविता आले.संघटना हेच माझे कुटुंब आहे.” असे भावनिक उदगार सत्कारमूर्ती डॉ.घोरपडे यांनी यावेळी वैक्त केले.यावेळी सौ. स्नेहलताई घोरपडे यांनी पण आपल्या भावना वैक्त केल्या.
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनील नरांजे होते. यावेळी डॉ. संजय गोरे यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या कार्यकर्तृत्वावर सीनेट सदस्य श्री प्रशांत ठाकरे, डॉ.नरेंद्र आरेकर ,डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. सुदर्शन दिवसे, डॉ. दशरथ आदे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमांचे संचालन प्रा. विवेक गोर्लावार यांनी तर सत्कार सोहळ्याचे आभार डॉ. प्रमोद बोधाने यांनी मानले. यावेळी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हातील गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स अससोसिएशन चे सर्व सदस्य व पदाधिकारी सर्वश्री डॉ. विजय वाढई ,डॉ. अक्षय धोटे डॉ. नंदाजी सातपुते डॉ.सतीश कंन्नाके, डॉ.नरेंद्र हरणे,डॉ. सुदर्शन दिवसे,डॉ. जनार्धन काकडे,डॉ. श्रीराम गाहाणे , डॉ.राजु किरमिरे, डॉ.नरेन्द्र आरेकर,डॉ, चुधरी डॉ. शशीकांत गेडाम डॉ. विना जंबेवार,डॉ. लता सावरकर डॉ. रुपेश कोल्हे,डॉ. राजेंद्र गोरे ,डॉ भांडारकर, डॉ. भगवान धोटे,प्रा.संजय राऊत इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर