BREAKING NEWS:
महाराष्ट्र

सिल्लोड येथे नप प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको……

Summary

नगर परिषद प्रशासनाने अतिरेक केल्यास रुमण हातात घेऊ-सांडू पाटील लोखंडे सिल्लोड प्रतिनिधी-नगर परिषद प्रशासनाणे भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या अधिकृत बांधकामावर अनधिकृतपणे बुलडोजर चालवीला आहे नगर परिषद प्रशासनाचा हा मनमानी कारभार सहन करणार नाही […]

नगर परिषद प्रशासनाने अतिरेक केल्यास रुमण हातात घेऊ-सांडू पाटील लोखंडे
सिल्लोड प्रतिनिधी-नगर परिषद प्रशासनाणे भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या अधिकृत बांधकामावर अनधिकृतपणे बुलडोजर चालवीला आहे नगर परिषद प्रशासनाचा हा मनमानी कारभार सहन करणार नाही यापुढे जर हा मनमानी कारभार थांबविला नाही तर नप च्या विरोधात हातात रुमण घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपचे माजी आ सांडू पाटील लोखंडे यांनी दिला.
दि 12 शुक्रवार रोजी दुपारी सिल्लोड येथे नप प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रास्ता रोको आंदोलनामुळे तब्बल दिड तास रस्त्यावर वाहने रस्त्यावर अडकून पडली होती.
यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना देण्यात येऊन सदरील प्रकारणाविरोधात शहर पोलीस ठाणे येथे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी तक्रार दिली.
यावेळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश बनकर, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी,शहराध्यक्ष कमलेश कटारिया,सुनील मिरकर,मकरंद कोरडे,अशोक तायडे,मनोज मोरेल्लू यांनी केवळ भाजपा कार्यकर्ते हे सत्तार यांच्या विरोधात काम करीत असल्याने नगर परिषद प्रशासन हे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोलण्यावरून कार्यवाही करीत असल्याचा आरोप यावेळी केला..यावेळी किसान मोर्चाचे संजय डमाळे,पं. स. सदस्य अनिल खरात,भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.प्रकाश नवाल,दादाराव आळणे, विष्णू काटकर, संतोष ठाकूर, शामराव आळणे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर राऊत,गणेश भूमकर, मयूर कुलकर्णी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष किशोर गवळे, शहराध्यक्ष अरुण राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष राजू गायकवाड, अमोल ढाकरे, मोतीराम मिसाळ, भाऊ गोमटे, नंदकुमार श्रीवास्तव, मधुकर जाधव, प्रकाश भोजवानी, वैभव स्नानसे, किरण शिरसाठ, योगेश सोनवणे, योगेश पवार,स्वप्नील शिनगारे, कृष्णा अहिरराव, उमेश सरोदे, पवन स्नानसे, आकाश खंडागळे, सुनील आरके, विजय माळकरी, सागर निकम, सुभाष साळवे, योगेश ढोरमरे, दयानंद संसारे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांनी घेतले ताब्यात…….
भाजपा पदाधिकारी यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत नगर परिषद कार्यालय कडे जाण्याचा निर्णय घेताच पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले.पोलीस ठाण्यात समज देऊन सर्वांना सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *