महाराष्ट्र

सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी……. शिवप्रेमी मध्ये संचारला उत्साह…… राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार लोकार्पण…..

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.18, सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शास्त्रीनगर भागात तलाठी भवन जवळ उभारण्यात आलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे लोकार्पण राज्याचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज ( शुक्रवार ) रोजी संपन्न होणार आहे. रयतेचे […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.18, सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शास्त्रीनगर भागात तलाठी भवन जवळ उभारण्यात आलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे लोकार्पण राज्याचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज ( शुक्रवार ) रोजी संपन्न होणार आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आज ( दि 19 ) शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

यावेळी यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, बांधकाम सभापती किशोर पाटील बलांडे , औरंगाबाद,सिल्लोड तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर,नगराध्यक्षा राजश्री राजरत्न निकम ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे,नप मुख्याधिकारी सैय्यद रफिक आदींची उपस्थिती राहणार आहे.

शहरात भव्य दिव्य असा महाराजांचा चौक असावा असा संकल्प राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता त्याच अनुशंगाने शहरातील शास्त्री कॉलोनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे काम सुरू करण्यात आले. काम पूर्ण झाल्याने महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या भव्य दिव्य चौकाचा लोकार्पण सोहळा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून महाराजांच्या चौकाचा लोकार्पण सोहळा भव्य दिव्य व अविस्मरणीय राहावा यासाठी चौकापासून ते भगत सिंग चौकापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महारांच्या चौकामुळे शिवप्रेमी मध्ये उत्साह संचारला असून शिवजयंती निमित्त होत असलेल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवप्रेमी सज्ज झाले आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्शवभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून जयंती साजरी करावी असे आवाहन सिल्लोड तालुका शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.
पोलिस योद्धा न्यूज
सिल्लोड प्रतिनिधी
शेख चांद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *