देश महाराष्ट्र राजकीय

सावित्रीमाईचा जन्मदिन “महिला मुक्ती दिन” म्हणूनच साजरा करा – निराशा गुरनुले

Summary

हजारो वर्षांपासून स्ञी गुलाम म्हणून जगत होती, या गुलामीतून आम्हा स्ञीयांना मुक्त करण्यासाठी सावित्री जोतीरावांनी आपले संपुर्ण जीवन स्ञी मुक्तीसाठी वाहुन घेतले, साविञीमाईच्या जन्मामुळे आज स्ञीयांना सन्मान मिळतो आहे म्हणूनच ३ जानेवारी हा साविञीमाईचा जन्मदिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा […]

हजारो वर्षांपासून स्ञी गुलाम म्हणून जगत होती, या गुलामीतून आम्हा स्ञीयांना मुक्त करण्यासाठी सावित्री जोतीरावांनी आपले संपुर्ण जीवन स्ञी मुक्तीसाठी वाहुन घेतले, साविञीमाईच्या जन्मामुळे आज स्ञीयांना सन्मान मिळतो आहे म्हणूनच ३ जानेवारी हा साविञीमाईचा जन्मदिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करा असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक निराशा गुरनुले यांनी केले
धानोरा येथे माळी समाज महिला समिती धानोरा यांच्या वतीने साविञीमाई जन्मदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण सोनुले, मार्गदर्शक psi देशमुख मँडम, मानसी सोनुले, प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना लेनगुरे, रंजना सोनुले, वर्षा चिमुरकर, अल्का सहारे, चटारे मॅडम, राऊत मॅडम, शर्मिला मशाखेञी, दुगा मॅडम, पायल तुलावी, मुकाजी भेंडारे, राजु मोहुर्ले, गिरीधर सोनुले आदि मान्यवर उपस्थित होते
यावेळी गणेश मोहुर्ले व प्रतिमा मोहुर्ले या दाम्पत्याच्या सत्कार करण्यात आला, तसेच तालुका सरीय सत्यशोधक परिक्षा, फ्रि हॅन्ड रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी व गित गायन स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा निकेसर, प्रास्ताविक अरुणा सोनुले आभार प्रदर्शन रज्जू चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री सहारे, नलु गुरनुले, चंदा सोनुले, पुष्पा ठाकरे, जास्वंद गावतुरे, छाया भेंडारे, शिला आवळे, सुरेखा कोकोडे, प्रिया मांदाळे, मोना मांदाळे, वैशाली वाडगुरे, उज्वला मोहुर्ले, शितल निकोडे, सारिका शेन्डे, रेखा मोहुर्ले, गिता सहारे, राधिका ठाकरे, पोर्णिमा ठाकरे, सरला गुरनुले, मनिषा सोनुले, मालु गुरनुले, किर्ती गुरनुले, दर्शना निकेसर, प्रतिभा सहारे यांनी प्रर्यत्न केले या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते

प्रा शेषराव येलेकर
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *