साटक ला ग्रामीण महिलाचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीर
नागपूर कन्हान : – दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड नागपुर आणि संकल्प ग्रामोत्थान बहु संस्था टेकाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने साटक ग्राम पंचायत भवन परिसरात ग्रामीण असंघटित महिलांचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
प्रशिक्षण शिबीरांचे उद्घाटन ग्राम पंचायत साटक सरपंचा सिमाताई उकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड नागपुर चे अधिकारी प्रमोद रत्नपारखी, दामोधर रामटेके, गजराज देवियां, सुनिता रंगारी, वशिष्ठ यादव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रमोद रत्नपारखी हयानी बोर्ड द्वारे संचालित विविध कार्यक्रमाची माहीती देत विश्व व्यापी कोरोना महामारी पासुन बचावाच्या उपाय योजना वर मार्गद र्शन केले. दामोधर रामटेके यानी ग्रामिण महिला करिता सरकार व्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना विषयी सांगितले. उद्घाटक सिमाताई उकुंडे यांनी महिला सबलीकरणा करिता स्वंयसहायता बचत गटाच्या माध्यमातुन मिळणा-या विविध योजनाचा तसेच सरकार च्या विविध योजना आणि शिक्षण- प्रशि क्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन आर्थिक रूपाने सक्षम बनण्याचे आवाहन केले. संस्था सचिव अरविंद कुमार सिंह यांनी आपल्या प्रास्ताविका तुन पंचायत राज व ग्राम सभेचे महत्वा विषषी मार्गदर्शन केले. सुत्र संचाल न रिना जांगडे हयांनी तर आभार छायाताई भुते यांनी व्यकत केले. या शिबीराचा मोठया संख्येने महिलांनी उपस्थित राहुन लाभ घेतला. यशस्विते करिता ग्राम संघ अध्यक्ष पुष्पा काउत्रे, सुनिता जांगडे, समता भुते, राधा हिंगे, कल्पना आदीने सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
तथा नागपूर विभागीय अध्यक्ष
डॉ पं दे राष्ट्रिय शिक्षक परिषद