सर्वाना सोबत घेवून सर्वांगिण विकास करणारा नेता- रोहित पवार
Summary
जामखेड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतिंची निवडणूक होत आहे. आमदार रोहित पवारांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतिंना ३० लाख रुपयाच्या विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. आमदारांच्या याच घोषनेला प्रतिसाद देत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व गावचा सर्वांगिण विकास या व्यापक दृष्टिकोनातून तालुक्यातील १० ग्रामपंचायत […]
जामखेड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतिंची निवडणूक होत आहे. आमदार रोहित पवारांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतिंना ३० लाख रुपयाच्या विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. आमदारांच्या याच घोषनेला प्रतिसाद देत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व गावचा सर्वांगिण विकास या व्यापक दृष्टिकोनातून तालुक्यातील १० ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.
आ. रोहित पवारांनी गेल्या वर्षभरात पूर्ण केलेल्या तसेच मंजूर व प्रस्तावित विकास कामांचा आढावा जनतेसमोर विविध बैठकां दरम्यान मांडला आहे.
गावं हेच विकासाचा केंद्रबिंदु मानून रोहित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण न करता सर्वांना सोबत घेवून काम करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ते स्वता देखिल कायमचं प्रयत्नशिल असल्याचे दिसते.
तालुक्याच्या भौतिक विकासासोबतच आरोग्य, शिक्षण, पाणी, महिला, युवक, अशा विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आ. रोहित पवारांनी तालुक्याला विकासाची नवी दिशा देण्याचे काम केलेले आपणास दिसते.
समाजभावनेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणारे विविध विकास कामे खाली नमूद केलेले आहे. सदर विकास कामांवर आ. रोहित पवार युद्ध पातळीवर पाठपुरावा करत असून नजीकच्या काळात ते कामे पूर्णही होतील. फक्त साथ हवी आहे आपल्यासाख्या सर्व सामान्य जनतेची.
प्रस्तावित कामे
१) गीते बाबा, भगवान बाबा, विट्ठल या दैवतांच्या मूर्तिंची प्रतिष्ठापना करणे.
२) खरडा येथील किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व किल्ल्यामध्ये सुशोभिकरन
३) नींबाळकर गढिचा ऐतिहासिक वास्तु म्हणून समावेश करणे.
४) खरडा भागातील १२ ज्योतिर्लिंगाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करणे.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750,