सरपंच पदी सविता कुडके उप सरपंच पदी बिनाबी पठाण यांची वर्णी
के-हाळा –सिल्लोड तालुक्यातिल के-हाळा ग्रामपंचायत निवडणुकीत छत्रपती शिवशाही ग्राम विकास पॅनल चे पॅनल प्रमुख अशोक पांढरे . दत्ता कुडके अर्जुन वाघ. कृष्णा पांढरे. शेख ईसा. यांच्या समती ने सरपंच पदाच्या निवडनुकित सविता कुडके. सरपंच पदावर विराजमान झाल्या तर उप सरपंच पदावर बिनाबी पठाण यांनी बाजी मारली .
सरपंच पदासाठी सविता कुडके यांना दहा तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार साहेबराव बांबर्डे यांना तिन मते मिळाली .तर उप सरपंच पदाच्या निवडनुकित बिनाबी पठाण यांना दहा तर शिवनंदा भिंगारे यांना तिन मते मिळाली .सरपंच उपसरपंच पदावर दोन्ही महीला विराजमान झाल्याने आता गावचा कारभार महीलांच्या हाथात आला आहे.
निवड प्रक्रिया संपताच शिवसेनेच्या शकडो कार्यकर्त्यानी फटाक्यांची अतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.