सरकारी यंत्रणेने निगेटिव्ह विचार पेरणे बंद करावे – प्रकाश पोहरे. कोरोनाच्या नावावर झुलविणे आता पुरे झाले. भितीचा बाजार उधळवा.
Summary
अकोला जिल्हा वार्ता:- प्रकाश पोहरे यांच्याशी पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क ने संपर्क साधला. कोरोना या कथित महामारीच्या पृष्ठभूमीवर गेल्या सात महिन्यापासून सातत्याने पेरले जात असलेले निगेटिव्ह विचार सरकारी यंत्रणांनी पेरणे बंद करावे. या पेरल्या जात असलेल्या निगेटिव्ह विचारांमुळे जनमाणसात भितीचे […]
अकोला जिल्हा वार्ता:- प्रकाश पोहरे यांच्याशी पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क ने संपर्क साधला. कोरोना या कथित महामारीच्या पृष्ठभूमीवर गेल्या सात महिन्यापासून सातत्याने पेरले जात असलेले निगेटिव्ह विचार सरकारी यंत्रणांनी पेरणे बंद करावे. या पेरल्या जात असलेल्या निगेटिव्ह विचारांमुळे जनमाणसात भितीचे वातावरण निर्माण होत असून, घराघरात मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या बळावत आहे. ही संख्या कोरोना संसर्गाच्या संख्येपेक्षा कमी नाही. त्यामुळे कोरोनापेक्षा आता मानसिक आजाराची मोठी लाट येऊन घर, राज्य पर्यायाने देश मानसिक विकलांगतेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे खळबळजनक परंतु, साधार विधान प्रकाश पोहरे यांनी पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क शी बोलताना केले.
कोरोनाच्या नावांवर मार्च ते ऑगस्ट अशी सहा महिने २१-२१ दिवसाचा कालावधी वाढवत लॉकडाउन करुन नागरिकांना झुलवत ठेवले . या काळात देशभरात मजुरांचे मोठे स्थलांतर होऊन कोट्यवधी मजूर कच्चा-बच्चांसह पायदळ आपआपल्या गावी परतले. वाहनांची सोय तर नव्हतीच; उलट यंत्रणेचा ससेमीरा पाठिशी होता. यामध्ये रस्त्यानेच हजारो मजूरांना आपले प्राण गमावावे लागले , रस्त्यावर पोलीस यंत्रणा त्रास देते म्हणून मग ही मंडळी कधी आडमार्गाने तर कधी रेल्वे पटरी वरून तर कधी जंगलातुन गेली ,त्यात अनेक लोक मेलेत मात्र त्याची आकडेवारी कुण्याही यंत्रणेकडे उपलब्ध नाही. कोरोनासंदर्भी पसरवलेल्या अनामिक भितीमुळे या लोकांना रस्त्यात ना कुणी जेवण दिले ,ना प्यायला पाणी.
अनेकांच्या हातचे काम गेल्याने भूकबळी गेलेल्यांची संख्याही कमी नाही. अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले. तथापि, सरकारी यंत्रणांकडून सकारात्मक विचार किंवा धीर देणारे विचार नव्हे तर नकारात्मक आणि दहशत पसरविणारे विचारच पेरले गेले, आजही पेरले जात आहेत. दरम्यान, सप्टेंबरपासून अनलॉकचे टप्पे सुरु करण्यात आले असले तरी या टप्यातही नागरिकांत नकारात्मक विचारांनी नागरिकांत कोरोनाची भिती पसरवली जात आहे.
भिती, भिती आणि भिती
कोरोनाची भिती पसरविण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कोणतीच संधी सोडली नाही. मोबाईलच्या रिंगटोनपासून सुरुवात केली. प्रसार माध्यमे, वृत्तपत्रांतून भितीयुक्त जाहीरांतीचा भडीमार, टीव्ही चॅनल्सवर कोरोना एके कोरोना अश्याच वृत्तमालिका चालविल्या गेल्या, आजही तेच चित्र कायम आहे. यंत्रणांनी हे चित्र आता बदलावावे, सकारात्मक विचारांची मांडणी करावी, असे पुढे बोलताना पोहरे म्हणाले.
////////////////
यंत्रणेने उभा केला बागुलबुवा
कोरोनासंदर्भात यंत्रणांनी भितीचा प्रचंड बागुलबुवा उभा केला. कोरोनापासून वाचण्याकरिता सॅनिटायझर, मास्क आणि नियमित हात धुण्यापलिकडे कोणतेही उपाय सुचविलेले नाहीत, कारण तसा औषधोपचारच उपलब्ध नाही. आयुष मंत्रालयाने केलेल्या शिफारशींना गुंडाळून ठेवले. आयुर्वेदचा काढा, निलगिरी तेलाची वाफ अन्य आयुर्वेदिक उपचार एवढेच नव्हे तर आजीच्या बटव्यातील रामबाण ठरत असलेल्या उपायांना अव्हेरले गेले. खरे तर या कालावधीत योगासने, निसर्गोपचार अश्या बाबींचा प्रचार प्रसार करायची सुवर्ण संधी उपलब्ध झाली होती ,मात्र यंत्रणेने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले.
या षडयंत्रा अंतर्गत योगाचे वर्ग , जिम , निसर्गोपचार केंद्र, विपश्यना केंद्रे यावर बंदी घातल्या गेली . खरे तर या काळात या सगळ्या गोष्टींचा प्रसार प्रचार करायला हवा होता मात्र तो न करता लोकांना सकाळी फिरायला सुद्धा बंदी घालण्यात आली. एकूणच सरकारी यंत्रणांनी कोरोनाची भिती वाढविण्यात व अलोपॅथी चा प्रचार करण्यात कोणतीच कसर सोडली नसल्याचा आरोपही पोहरे यांनी केला.
/////////////////
घराघरात मानसिक रुग्ण
लॉकडाऊनच्या सात महिन्याच्या काळात महिला, बच्चेकंपनी आणि वयोवृध्द सर्वाधिक भयभित झाले. या काळात ८० ते ९० टक्के महिला, वृध्द व बच्चेकंपनी घराच्या बाहेर पडलेले नाहीत. मुलांना स्वच्छंदीपणाने वागता आले नाही. कुठे कुठे तर नातवंडांना आजी आजोबा पासून लांब राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात . या सगळ्या अमानवीय प्रकारामुळे वयोवृध्दांना अपार वेदना झाल्यात , तसेच त्यांना वेळ घालविता आला नाही. त्यामुळे या घटकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन घराघरात मनोरुग्ण वाढले असल्याचे पोहरे म्हणाले.
/////////////////
सरकार कुटुंबप्रमुखांचे कर्तव्य विसरले
सरकार म्हणजे कुटुंबप्रमुख. बिकट परिस्थितीमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना धीर देण्याचे काम कुटुंबप्रमुखांचे असते. घाबरु नका, आजारांचे समुळ उच्चाटन करण्यात प्रभावी असलेल्या आयुर्वेद उपचार प्रणालीचा , योग प्राणायामाचा अवलंब करा. असे कुठेही जोरकसपणे मांडले गेले नाही. नागरिकांना मुर्ख आणि गावंढळ समजून केवळ भितीचा प्रसार, प्रचार करण्यावर भर दिला जात असून, ’डर का बाजार’ भरविला जात असल्याचा पोहरे यांनी घणाघात केला.
//////////////////
जग कोरोनातून बाहेर
अनेक देश्यानी लॉक डाऊन केले नाही , बहुतांश जग कोरोनातून बाहेर आले आहे, येत आहे. परंतु आपल्या “इंडिया”तील राज्य सरकारे अद्यापही कोरोनातून बाहेर येण्यास तयार नाहीत. त्यांना अजूनही कोरोनातच राहण्याची इच्छा आहे. सरकारी यंत्रणेला तर अजूनही काही काळापर्यंत कोरोनाच्या नावावर नागरिकांना झुलवत ठेवायचे आहे, असा आरोप पोहरे यांनी केला.
//////////////////
यंत्रणांना सापडला लूटीचा मार्ग
कोरोनाच्या लॉकडाउन काळात सरकारी यंत्रणांना लूटीचा मार्ग सापडला. त्यांनी नियम, निकष आणि निर्बंधाच्या नावावर नागरिकांची विशेषत: शेतकर्यांची अक्षरश: लूट केली. लुटीचे अनेक प्रकार नागरिकांनी चव्हाट्यावर आणले असले तरी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या धाकाखाली ही प्रकरणे दडपली गेल्याचा पोहरे यांनी आरोप केला.
/////////////////
आवाहन
गत सहा, सात महिन्यातील अनुभवातून धडा घेतलेल्या नागरिकांनी आपल्या सदसदविवेक बुध्दीचा वापर करावा.
लॉकडाउन मधे राहायचे की ते झिडकारायचे, याचा निर्णय घ्यावा. नागरिकांना मुर्ख बनवायचा आणि त्यांच्या खिशातील पैसा काढायचा यावर सरकारे भर देत आहेत. नागरिकांनी हे लक्षात घेऊन कथीत कोरोनाच्या भयातून बाहेर यावे. याबाबत यू-ट्यूबवर पोहरे यांनी व्हीडीओदेखील अपलोड केला असून, केवळ प्रकाश पोहरे नाव टाकल्यास हा व्हिडीओ उपलब्ध होऊ शकतो, नागरिकांनी हा व्हिडीओ अवश्य पाहावा, असे आवाहन पोहरे यांनी केले आहे.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491