संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती
Summary
मुंबई, दि.२६ : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालय येथे राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे […]
मुंबई, दि.२६ : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालय येथे राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी देखील त्यांचेसोबत उद्देशिकेचे वाचन केले.