संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन; जन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई दि. ३० – शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू संत श्री गुरु नानक यांची आज जयंती. त्यानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
मुख्यमंत्री म्हणतात ‘ईश्वर एकच आहे आणि तो चराचरात आहे’ असा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची त्यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.