संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी कन्हान शहर विकास मंच व्दारे साजरी
नागपूर कन्हान : – संत गाडगे बाबा यांची ६४ वी पुण्यतिथी गांधी चौक कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच व्दारे कार्यक्रमासह साजरी करण्यात आली.
कन्हान शहर विकास मंच व्दारे संत गाडगे बाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्य गांधी चौक कन्हान येथे मंच महिला सदस्य सुषमा मस्के यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्र माची सुरवात करण्यात आली. मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी संत गाडगे बाबा यांचा जीवनावर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मंच पदाधिकारी यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृष भ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, कल्याणी सरोदे, मुकेश गंगराज, अक्षय फुले सहित मंच पदाधि कारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535