संताजी सोशल मंडळातर्फे कु. प्राची कोठारे हिचा सत्कार.
जिल्हा गडचिरोली वार्ता: संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे गडचिरोली येथील कु. प्राची शंकरराव कोठारे ही नीट परीक्षेत देशातून 156 व्या स्थानावर, ओबीसी मधून 32 वी, तर तेली समाजातून विदर्भात पहिली आली असून तिने गडचिरोली जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्रातील स्थान उंचावले आहे. त्यामुळे संताजी सोशल मंडळाच्यावतीने कु. प्राची कोठारेला पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व रोख १००० रुपये देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला संताजी मंडळ गडचिरोली चे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, सचिव श्री गोपीनाथ चांदेवार, कोषाध्यक्ष श्री राजेश इटणकर, संघटक सुरेश भांडेकर, श्री विठ्ठल कोठारे, श्री सुधाकर लाकडे,श्री सुधाकर दुधबावरे, श्री शंकरराव कोठारे, पारस कोठारे, चंद्रकांत किरमे उपस्थित होते. कू प्राची कोठारे मनोगत व्यक्त करताना म्हणाली की, मला ८ व्या वर्गापासूनच भाऊ पारस कोठारे, वडील शंकरराव कोठारे व माझे गुरुजन वर्ग यांचे सतत मार्गदर्शन लाभले आहे. त्यामुळेच मी विदर्भात पहिली आली आहे. पुढे डॉक्टर होऊन गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्याचा मानस यावेळी तिने व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन सुधाकर लाकडे तर आभार सुरेश भांडेकर यांनी मानले.
प्रा. शेषराव येलेकर
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली