महाराष्ट्र

संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे यांचे आकस्मिक निधन चटका लावणारे – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Summary

मुंबई, दि. 10 : “कारकीर्द ऐन भरात असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने तरुण, प्रतिभावान संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे यांचे झालेले आकस्मिक निधन हे चटका लावणारे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या […]

मुंबई, दि. 10 : “कारकीर्द ऐन भरात असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने तरुण, प्रतिभावान संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे यांचे झालेले आकस्मिक निधन हे चटका लावणारे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

“भिडे यांनी अनेक नाटकं, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांचे योगदान रसिकांच्या सदैव स्मरणात राहील”, असेही श्री.देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *