शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी ‘या’ कारणांसाठी बेमुदत संपावर
सोलापूर जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांनी विविध मागणी व अडाचणीबाबत आजपासून बेमुदत संप पुकारला असून याचे निवेदन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अडी – अडचणी खालीलप्रमाणे.
शासनाकडुन नवीन तलाठी सजे व महसुल मंडळे निर्मिती करणेबाबत आदेश देऊनही जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत सजे व मंडळ निर्मिती केलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये सन २०१७ पासुन ते अद्यापपर्यंत तलाठी संवर्गातुन मंडळ अधिकारी म्हणुन पदोन्नती दिली गेलेली नाही.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सन २०१७ ते आजतागायत तलाठी व मंडळ अधिकारी यांची सेवा जेष्ठता यादी अद्ययावत करणेत आली नाही. ती सन २०२० पर्यंत अद्ययावत करून शासन निर्णयाप्रमाणे मुदतीत प्रसिध्द करणेत यावी.
सोलापूर जिल्हयात तलाठी व मंडळ अधिकारी हे अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. तरी त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अतिरिक्त कार्यभाराचे वेतन देणेत यावे.जिल्ह्यामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांचे वेतन महिन्याचे किमान ५ तारखेपर्यंत व्हावे.
परंतु असे न होता कार्यालयीन कर्मचारी यांचे वेतन वेळेत होते. तलाठी व मंडळ अधिकारी यांचे वेतन २० तारखेपर्यंत होते.
जिल्ह्यामध्ये आस्थापना महसुल सहायक हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल (CR) वेळेत भरून देत नाहीत. त्यामुळे कालबध्द पदोन्नती किंवा नियमीत पदोन्नतीचे वेळेस त्यांना अडचण निर्माण होते.
तरी कार्यमुल्यमापन अहवाल वेळेत भरून द्यावेत. अन्यथा संबधीत आस्थापना महसुल सहायक यांना जबाबदार धरून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करणेत यावी.
सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच उपविभागीय स्तरावर विभागीय निवृत्त व कार्यरत कर्मचारी यांचेवर विभागीय चौकशीची (DE) प्रकरणे सुनावणी पुर्ण होऊनही अद्यापपर्यंत सदर प्रकरणांमध्ये निर्णय देणेत आलेला नाही.तसेच विभागीय चौकशीची अपिलाची प्रकरणे देखील प्रलंबीत असुन त्यामध्ये सुध्दा निर्णय देणेत आलेला नाही. या बाबत वारंवार पाठपुरावा करूनही विभागीय चौकशीची प्रकरणे निर्गत केली जात नाहीत.
दुय्यम निबंधक यांचेकडून येणारे दस्त सदोष असतात बरेच दस्त नष्ट करावे लागतात व पुन्हा पारंपारिक पध्दतीने नोंदी धराव्या लागतात.अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला असून या संदर्भात मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले आहे
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क