शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा.
१० वी १२वीच्या परीक्षेची तारीख ठरली.
कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या .त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर
मोठा परिणाम झालाआहे.मात्र दहावी बारावीचा परीक्षा कशी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता.दहावी बारावी परीक्षेबाबत ची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे.बारावीची लेखी परीक्षा गेल्या २३ एप्रिल पासून सुरु होणार आहे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेतली जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
परीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्यांचा शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल .तर दहावीचा निकाल ऑगसटच्या शेवटच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली .बारावीची
प्रॅक्टिकल परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे.तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा व एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
कोरोणा मुळे दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्ष फेब्रुवारी मार्च मध्ये सुरू होणाऱ्या परीक्षा उशिराने होत आहे.सध्या मुंबई ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत.शिवाय लॉक डाऊन काळातही ऑनलाईन वर्ग सुरू होते.राज्यात नववी ते बाराविच्या शाळा मध्ये दिवशें दिवस विदयार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे.१८ जानेवारी रोजी २१,६६,०५६ विद्यार्थी शाळा मध्ये येत आहेत.तर २१२८७ शाळा सुरू आहेत.सुमारे ७६.८ टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत हे उत्साह वर्धक चित्र आहे.
कोविड १९ संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागात वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटे कोर पालन करण्याचा अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.असे वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात शाशन प्रयत्न करणार आहेत .त्यासाठी विशेष मोहीम राबिण्यात येणार आहे.वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील स्थानिक शिक्षण अधिकारी वर्गा कडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर