BREAKING NEWS:
महाराष्ट्र

विमुक्त, भटक्या जमातींचा ओ.बी.सी.मोर्चा ला जाहीरपाठिंबा…..!

Summary

चंद्रपूर दिनांक २० नोव्हेंबर अखिल भारतीय विमुक्त जाती जमाती वेल फेअर संघ दिल्ली महाराष्ट्र शाखा जिल्हा चंद्रपूर चे विद्यमाने, सदर संघटनेचे पदाधिकारी व या प्रवर्गातील गाडी लोहार,लोहार, बेलदार, कापेवार भोई,केवट, गोलकर गवळी, नाथ जोगी, नंदिवाले, वंजारी, गोंधळी, वडार, धनगर, बहुरूपी, […]

चंद्रपूर दिनांक २० नोव्हेंबर
अखिल भारतीय विमुक्त जाती जमाती वेल फेअर संघ दिल्ली महाराष्ट्र शाखा जिल्हा चंद्रपूर चे विद्यमाने, सदर संघटनेचे पदाधिकारी व या प्रवर्गातील गाडी लोहार,लोहार, बेलदार, कापेवार भोई,केवट, गोलकर गवळी, नाथ जोगी, नंदिवाले, वंजारी, गोंधळी, वडार, धनगर, बहुरूपी, शिकलगार, फासे पारधी, मदारी, पोतराज, इत्यादी समाजाचे तत्सम उपजातींचे प्रतिनिधी सह ओबीसी मोर्चाचे आयोजक यांचेसह विश्वकर्मा भवन मुल रोड चंद्रपूर येथे दिनांक २०.११.२० ला दिनांक २६.११.२० चे नियोजित ओबीसी विशाल मोर्चा नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाले.
सदर बैठक आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांचे अध्यक्षते खाली डॉक्टर, राकेश गावतूरे, डॉक्टर कदम, डॉक्टर राजू ताटेवार, चंद्रशेखर कोटेवार,विजय पोहनकर किशोर घनकसार , प्रा. योगेश दुधपाचारे, अशोक पडगेलवार , अशोक जाधव, रतन शिलावार इत्यादींचे प्रमुख उपस्थितीत विमुक्त भटक्या समाजा सह ओबीसी प्रवर्गातील दशा, स्थिती बाबत सविस्तर चर्चा व मान्यवरांनी आपले मनोगतातून या प्रवर्गातील लोकांचे विकासाची संधी मिळणे करिता जनगणनेचे महत्त्व पटवून दिले. व सदर समाजाचे जनगणना होऊन त्यानुसार शैक्षणिक ,आर्थिक , राज्यकीय क्षेत्रातील विविध योजनांचे माध्यमातून विकासाचे संधी मिळालेच पाहिजे या विषयाला धरून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर
येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले तेंव्हा सदर मोर्चा मध्ये सामील होण्याकरिता पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार उपस्थित समस्त पदाधिकारी व प्रतिनिधींनी एकमताने ओबीसी विशाल मोर्चा ला पाठिंबा देऊन, समस्त समाज या मोर्चात सामील होण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे.
या प्रसंगी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे संचलन अशोक पडगेलवार, आभार प्रदर्शन विजय पोहनकर यानी केले. बैठक आयोजनात सुभाष हजारे, विजय बावणे, मनीष कन्नमवार, प्रगती पडगेलवार, इत्यादींनी परिश्रम घेतले.

विजय पोहनकर
जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर
अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *