विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा यांची मागणी.
Summary
✍️ आता चंद्रपूर ,तुकूम चा तत्कालीन तलाठी,व नुकताच सेवानिवृत्त झालेला मंडळ अधिकारी,व त्याच मंडळ अधिकारी संघटनेचा चंद्रपूर जिल्ह्याचा अध्यक्ष श्री प्रदिप जुमडे,यांनी तलाठी विनोद खोब्रागडे यांच्या वरवटचा खेड्यातील शेतीचा संदर्भ शहरातील तुकूम चंद्रपूर येथे देऊन बोगस 7/12 दे.गो.तुकूम चंद्रपूर महानगरपालिका […]
✍️ आता चंद्रपूर ,तुकूम चा तत्कालीन तलाठी,व नुकताच सेवानिवृत्त झालेला मंडळ अधिकारी,व त्याच मंडळ अधिकारी संघटनेचा चंद्रपूर जिल्ह्याचा अध्यक्ष श्री प्रदिप जुमडे,यांनी तलाठी विनोद खोब्रागडे यांच्या वरवटचा खेड्यातील शेतीचा संदर्भ शहरातील तुकूम चंद्रपूर येथे देऊन बोगस 7/12 दे.गो.तुकूम चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील स्वतःच बनवून,वर्ग 1 देऊन,मोठ्या प्रमाणात लाच घेऊन प्रदिप खांडरे व ईतर खांडरे परीवार यांना दिले.व त्यांनी संगनमत करून 26 एकर सरकारी जागेची विल्हेवाट लावली ,त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने तात्काळ तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे यांचावर F I R दाखल करून तात्काळ अटक करुन त्यांची अवैध मालमत्ता सरकारने जमा करुन,बुडालेला महसूल त्याचा पगारातून वसुल करावा.व सखोल चौकशी पी सी आर घेऊन कारवाई करावी,
ह्या कामासाठी त्या तलाठी यांनी,विनोद खोब्रागडे तलाठी यांचा वरवट येथील शेतजमिनीचा वापर पुन्हा कुठे कुठे केला याचाही शोध घ्यावे.
✍️हा सर्व बोगस प्रकार मी माझा उघड्या डोळ्यांनी आज मुळ रेकार्ड बघीतले असता दिसून आला.
ज्याअर्थी मुळ रेकॉर्डलाच नोंद नाही,व वरिष्ठांनी तसे आदेशही दिले नाही.ही बाब स्पष्ट दिसत असतानाही 2007 पासून ते 2020 आतापर्यंतचे तलाठी यांनी वरिष्ठांना सांगितले नाही,जानुनबूजून लपवून ठेवली,व आजही मला बोगस माहिती दिली,व उडवाउडवीची उत्तर दिली.
✍️अपराधाला साथ देने हा सुध्दा फौजदारी गुन्हा आहे,त्यामुळे आजचे तलाठी यांचावर सुध्दा फौजदारी कारवाई करावी.
✍️एक लक्षात घ्या,आपल्या देशात,भारतीय संविधानाचे अर्थात कायद्याचे राज्य आहे,मनमानीचे नाही.आणि मी कुनालाच सोडत नाही,हा माझा ईतिहास आहे.