BREAKING NEWS:
महाराष्ट्र राजकीय

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आधारवड दिवसेंदिवस वाढत असून

Summary

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या वंदनीय बाळासाहेबठाकरे शिवसेनावैद्यकीयमदतकक्षाचा आधारवड दिवसेंदिवस वाढत असून आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सदाशिव_पेठ, […]

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या वंदनीय बाळासाहेबठाकरे शिवसेनावैद्यकीयमदतकक्षाचा आधारवड दिवसेंदिवस वाढत असून आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सदाशिव_पेठ, पुणे येथे सुरु करण्यात आलेल्या पुणे शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून कक्षाच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वैद्यकीय मदतीकरिता सरकारी योजनांचा लाभ मिळेल तसेच रूग्णालयाच्या बिलात सवलत, महागड्या शस्त्रक्रिया मोफत अथवा सवलतीच्या दरात मिळतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्यानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कोविड_योद्धा सन्मान सोहळ्यात राज्यात कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व्यवस्था कमी पडू नये यासाठी अहोरात्र नि:स्वार्थीपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोविड योध्द्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. पुणे जिल्ह्यातील कोविड योध्यांना यावेळी त्यांच्या कार्याचा सन्मान करुन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये दुर्गम भागातील गरजु विद्यार्थ्यांना #सायकल_वाटप करण्यात आले तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत त्यांना त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील भावी वाटचाली करीता मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, कक्षाचे पुणे शहरप्रमुख राजाभाऊ भिलारे तसेच वैद्यकीय मदत क्षेत्राच्या पुणे शाखेचे पदाधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *