BREAKING NEWS:
महाराष्ट्र

रोजगार मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी करावी – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आतापर्यंत सात हजार उमेंदवारांनी केली ऑनलाईन नोंदणी

Summary

नागपूर,दि.11:उद्या (दि. 12) डिसेंबर व 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येंनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. विशेष म्हणजे आजपर्यंत सात हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, नोंदणी प्रक्रिया उद्या पण सुरु राहणार आहे.  आज […]

नागपूर,दि.11:उद्या (दि. 12) डिसेंबर व 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येंनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. विशेष म्हणजे आजपर्यंत सात हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, नोंदणी प्रक्रिया उद्या पण सुरु राहणार आहे.

 आज व उद्या ( 12 व 13 डिसेंबर) या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. http//www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागाला साडे आठ हजार तर नागपूर शहराला चार हजार उमेदवारांचे लक्ष्य दिलेले आहे. बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करुन हमखास नोकरी मिळवावी. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

 या मेळाव्यात उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, नर्स, रुमबॉय, एचआर, मॅनेजर, गार्ड पर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मॅकनिक, डिझेल मॅकेनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या हमखास संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, नर्स, रुमबॉय, एचआर, मॅनेजर, गार्डपर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या संकटाने अर्थचक्र काही प्रमाणात संथ झाले होते. रोजगाराच्या संधीद्वारे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी शासनाचा हा राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचा उपक्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *