राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रशिक्षण पूर्ण
वार्ताहर – कोंढाळी दुर्गा प्रसाद पांडे
येथील लखोटिया भुतडा CBSE हायस्कूलच्या सभागृहात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी आणि प्रचारासंदर्भात CBSE-COE पुणे च्या निर्देशानुसार शनिवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सी बी एस ई हायस्कूल चे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कैलासपती सिंघानिया हायस्कूल, विजयग्राम छिंदवाडा, म.प्र. च्या प्राचार्या कु. मनदीपा बॅनर्जी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या विषयावर मार्गदर्शन करून कोंढाळी सी बी एस ई हायस्कूल व कोंढाळीच्या लगतच्या सी बी एस ई हायस्कूल हायस्कूलच्या शिक्षकांशी सी बी एस ई शैक्षणिक धोरणावरील सर्व विषयांवर गांभीर्याने चर्चा केली व उपस्थित शिक्षकांनी ने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली. त्याच प्रमाणे या प्रसंगी माऊंट लिटरेजी हायस्कूल, नागपूरचे प्राचार्य अभयकुमार सोनटक्के यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील प्रकल्प कार्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली यात विद्यार्थ्यांना शिकवून विद्यार्थ्यांनी भविष्यात आपले करिअर कसे घडवता येईल या बाबतीत या प्रशिक्षणात उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण.. या प्रशिक्षणाप्रसंगी सीबीएसई हायस्कूल कोंढाळीच्या प्राचार्या डॉ.ज्योती राऊत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्याआयोजना संबधी प्रस्ताविकात माहिती दिली. कोंढाळी येथील सी बी एस ई हायस्कूल चे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सफलतार्थ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्राचे संचालन दिपाली नासरे यांनी तर आभार योगेश चौधरी यांनी मानले.