BREAKING NEWS:
महाराष्ट्र

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने कु. प्राची शंकरराव कोठारे हिचा सत्कार

Summary

जिल्हा गडचिरोली वार्ता:- शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शि ची विद्यार्थिनी कु. प्राची शंकरराव कोठारे ही वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत 720 पैकी 695 गुण प्राप्त करून उंच गगन भरारी घेत भारतातून 156 व्या क्रमांकावर, देशातून ओबीसी प्रवर्गातून […]

जिल्हा गडचिरोली वार्ता:- शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शि ची विद्यार्थिनी कु. प्राची शंकरराव कोठारे ही वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत 720 पैकी 695 गुण प्राप्त करून उंच गगन भरारी घेत भारतातून 156 व्या क्रमांकावर, देशातून ओबीसी प्रवर्गातून 32 व्या क्रमांकाने तर विदर्भातून प्रथम आल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तिचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या छोटेखानी सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादाजी चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, दादाजी चापले तर विशेष अतिथी म्हणून प्राची चे वडील शंकरराव कोठारे, भाऊ पारस कोठारे, संघटनेचे सदस्य गोपीनाथ चांदेवार, सुरेश भांडेकर ,राजेश इटणकर, विठ्ठलराव कोठारे, सुधाकर लाकडे, चंद्रकांत किरमे, सुधाकर दूधबावरे, पुरुषोत्तम ठाकरे उपस्थित होते. यावेळी प्राची कोठारे हिने आपल्या मनोगतातून दोन वर्ष कठोर परिश्रम, शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन, आई-वडिलांचे परिश्रम आणि आशीर्वाद माझ्या यशाचे गमक असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी प्राचीच्या गगनभरारी चे कौतुक करीत प्राचीने देशातील नामांकित डॉक्टर बनून गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असा आशावाद व्यक्त केला.तसेच प्राचीचे यश हे ओबीसी प्रवर्गासाठी अतिशय प्रतिष्ठेचे आणि भावी पिढीसाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे सचिव प्रा. देवानंद कांमडी , संचालन रामकृष्ण ताजने तर उपस्थितांचे आभार प्रा. विनायक बांदूरकर यांनी मानले.
प्रा. शेषराव येलेकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *