राष्ट्रीय आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ ची रक्कम गेली कुठे❓❓❓
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वेगवेगळ्या आस्थापनेवर अनेक कर्मचारी कत्राटी पद्धतीने मानधनावर काम करीत आहेत. परंतु माहे एप्रिल २०२० पासून या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात रक्कम जमा केली नाही त्यामुळे फार मोठा भृष्ठाचार होते की काय❓ अशी शंका बळावली आहे.
एक हजार च्या जवळपास कत्राटी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात जमा करण्यासाठी कपात करण्यात आली ती रक्कम माहे एप्रिल २०२० पासून जमा का होत नाही? ती रक्कम कोणाच्या खात्यात जमा केले आहे??? माहे नोव्हेंबर 2020 पर्यंतचे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन झाले आहे.. परंतु ईपीएफओ खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे आरोग्य शासनाच्या विविध प्रकारच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत शंभरकर यांना निवेदन देऊन माहिती दिली होती परंतु त्यानीही कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ बाबीकडे कानाडोळा केल्यामुळें अजून ही खात्यात पैसे जमा झाले नाही.
या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी पराकोटीने लक्ष वेधून घेण्याची गरज आहे. नाही तर न्याय हक्काचे दरवाजे खंबीरपणे जोरात ठोठावले जातील. त्या वेळी मात्र शासनाची तारांबळ उडाल्या शिवाय राहाणार नाही..