*रामकृष्ण मठ व्दारे आदर्श हायस्कुल च्या गरिब विद्यार्थ्यांना ब्लॉकिंट वितरण*
नागपूर कन्हान : – रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या शासनाच्या नियमाचे पालन करित आदर्श हायस्कुल कन्हान च्या गरिब विद्यार्थ्याना थंडी पासुन बचाव करण्याकरिता ब्लॉकिंट चे वितरण करण्यात आले.
शुक्रवार (दि.१८) ला आदर्श हायस्कुल सुरेश नगर कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या वतीने सोशल डिंस्टसिंग नियमाचे पालन करित शाळेतील ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या गरिब विद्यार्थ्यांना थंडी पासुन बचाव करण्याकरिता मठाचे स्वामी तनिष्ठा नंद महाराज व त्याच्या सहकार्या च्या हस्ते ब्लॉकिंट चे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना कोरोना आजारावर विजय मिळविण्या करिता सामाजिक अंतर पाळा, मॉस्क चा वापर नेहमी करा, गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी आयडियल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भरत सावळे, मुख्या ध्यापिका एस एस मसालकर, शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम एस डोंगरे यांनी तर आभार सी एन मेश्राम हयानी व्यकत केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535