युवा चेतना मंच तर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा
नागपूर कामठी
स्वामी विवेकानंद यांच्या 159 व्या जयंती व राष्ट्रीय युवा दीन निमित्त रनाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉक्टर संजय भाजीपाले संचालक रिलायबल हॉस्पिटल नागपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा चेतना मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दिवटे, युवा चेतना मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश महाडिक राष्ट्रीय, सनातन मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर अपाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर डॉ. टोंगसे प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, स्व. श्याम तांबोळी यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी जगदीश वानोडे अध्यक्ष युवा चेतना मंच हिंगणा, रुग्णसेवक योगेश नासरे, रूपाली नाटकर, रोशनी रमेश फुलकर, आपात्काल संघटना चे अध्यक्ष प्रमोदजी वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी राज्य रक्त संक्रमण परिषद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पराग सपाटे, प्रास्ताविक विनोद कोहळे व आभार प्रदर्शन रुपेश चकोले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अक्षय खोपे, बंटी पिल्ले, अमोल नागपुरे, श्रीकांत अमृतकर,अतुल चोरघडे, शिव कुशवाह, डॉ .निखील अग्निहोत्री, अशीष हिवरकर, उमेश गिरी, अमोल श्रावणकर, रामजी बोंढारे, प्रवीण आगाशे, प्रीती हिवरेकर,भावना सपाटे, सारिका नागपुरे, बॉबी महेंद्र, आशुतोष नवले, कमलाकर नवले, अतुल ठाकरे, अश्विन ठाकरे, नरेश सोरते, हर्षवर्धन आढाऊ, मयुर गुरव, कुणाल सोलंकी, पंकज वर्मा, प्रितेश खोपे, बाल्या सपाटे, नितीन ठाकरे आदींनी युवा चेतना मंच चे सदस्य तसेच नेहरू युवा केन्द्र, सनातन मित्र मडंळ, आपत्कालीन संघटना आदीनी सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535