मोहाडी तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करा- किशोर भैरम
सालई खुर्द ग्राम वार्ता:- मोहाडी तालुक्यातील उसर्रा, सालई खुर्द, काटे बामणी, डोंगरगाव आदी गावातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी विकास फाउंडेशन चे उसर्रा सर्कल प्रमुख किशोर भैरम यांनी केली आहे.
तालुक्यातील जवळपास 50 टक्के शेतकरी हलक्याफुलक्या धानाची लागवड करतो बहुतेक शेतकऱ्यांचे धान कापणी सुरू झाली तर काही शेतकऱ्यांनी धान्य मळणी केली आहे. वेळेअभावी धान केंद्र सुरू करण्यात आले नाही तर शेतकऱ्यांची लुबाडणूक होईल. शेतकऱ्यांना सरकारकडून बोनस मिळणार नाही याकरिता त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता किशोर भैरम यांनी केले आहे.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491